लोकप्रिय चित्रपटांमुळे ओळखले जाणारे बॉलिवूड कलाकार अनेक वेळा त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे गरजूंना मदतही करत असतात. बऱ्याच वेळा बॉलिवूड कलाकारांना पाहिल्यानंतर रस्त्यावर राहणारे गरीब लहान मुलं त्यांच्याभोवती घोळका करतात. यामध्ये अनेक वेळा ही कलाकार मंडळी त्यांना मदत करतात. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांची कोणतीही गोष्ट वाऱ्यासारखी पसरत असते. त्यामुळे जर त्यांनी एखाद्या गरजूला मदत केली तर त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. मात्र हे सारं अभिनेत्री जान्हवी कपूरला आवडत नसल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसापूर्वी जान्हवीने एका गरजू लहान मुलीला मदत केली. मात्र यावेळी तिने प्रसारमाध्यमांना फोटो न काढण्याची विनंती केली. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काही दिवसापूर्वी जान्हवी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. यावेळी जान्हवीला पाहिल्यानंतर एक गरीब लहान मुलगी तिच्याजवळ आली. या लहान निरागस मुलीला पाहिल्यानंतर जान्हवीने पटकन तिच्या बॅगमध्ये असलेला एक बिस्कीटचा पुडा तिला देऊ केला. विशेष म्हणजे जान्हवीला पाहिल्यानंतर अनेक कॅमेरामॅन तिचे या घटनेचे फोटो कॅमेरात कैद करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र जान्हवीने फोटोग्राफर्सला फोटो न काढण्याची विनंती केली.
“कृपया एका सेकंदासाठी कॅमेरा बंद करा. प्रत्येक वेळी असे फोटो काढणं योग्य वाटत नाही”, असं म्हणत जान्हवीने फोटोग्राफर्सला फोटो काढण्यास मनाई केली.
जान्हवीने केलेल्या या वर्तनामुळे तिच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस पडत आहे. अनेकांनी तिला दानशूर असल्याचंही म्हटलं आहे. इतकंच नाही तर जान्हवीने यापूर्वीदेखील अनेक गरजू लहान मुलांना मदत केली आहे. यापूर्वी तिचा ऑक्टोबर महिन्यातला एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये जान्हवीने ड्रायव्हरकरडून पैसे उधार घेत एका गरीब मुलीला मदत केली होती.
View this post on Instagram
#janhvikapoor snapped at salon in bandra today #viralbayani @viralbhayani
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाचा : ‘त्या’ गावात विराट-अनुष्काला कोणी ओळखलंच नाही
दरम्यान,’धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ती ‘दोस्तान २’ या चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे.