News Flash

जान्हवी कपूरने मालदीवमधील बिकिनीतील फोटो केला शेअर; ट्रोल होण्याआधीच म्हणाली…

"आम्ही सुरक्षित आहोत"

गेल्या महिन्यात अभिनेत्री जान्हवी कपूर  मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मालदीवमधील बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर देखील केले होते. मात्र नुकताच जान्हवीने एक फोटो शेअर करत ती मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली नसून कामानिमित्त गेलाच स्पष्ट केलंय. शिवाय हा फोटो शेअर करत हे फोटो शूट लॉकडाउनपूर्वीचं आहे हे देखील तिने चाहत्यांना सांगितलंय.

जान्हवी कपूरने एका मासिकाच्या कव्हरचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय . हा फोटो शेअर करत ती कॅप्शनमध्ये म्हणाली, “आधीपासून कमिट केलेली पोस्ट . लॉकडाउनआधी फोटो शूट झालंय. आम्ही सर्व सुरक्षित आहोत आणि सर्व प्रकारची काळजी घेत आहोत. आशा करते तुम्ही सगळे सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेत असाल.” असं कॅप्शन देत जान्हवी कपूरने ट्रोल होण्याआधी फोटोशूट लॉकडाउनपूर्वीच झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

गेल्या काही दिवसांपूर्वी भारतात करोनाचं संकट असतानाही अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असल्यामुळे ट्रोल झाले होते. मालदीवमधील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे या सेलिब्रेटींवर चाहत्यांनी निशाणा साधला होता. त्यासोबतच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी तसंच अभिनेत्री श्रुती हसन यांसारख्या कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ट्रोलिंग पासून बचाव करण्यासाठी जान्हवीने फोटो शेअर करत असताना तो लॉकडाउनपूर्वीचा असल्याचं स्पष्ट केलंय.

याआधी देखील जानवी कपूर चा आणखी एक फोटो शूट चांगलाच चर्चेत आलं होतं एका मासिकासाठी तिने हे फोटोशूट केलं होतं यामध्ये जानवी चा ब्रायडल लूक पाहायला मिळाला. जान्हवी कपूर लवकरच करण जोहरच्या दोस्ताना- 2 या सिनेमांमध्ये झळकणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:34 pm

Web Title: janhvi kapoor share photo from maladies said its before lock down kpw 89
Next Stories
1 ‘गॉड ऑफ नेपोटिझम’चा ठपका घालवण्यासाठी करण जोहरने आखला ‘मास्टरप्लान’
2 कंगनाला ट्विटरकडून दणका; अकाऊंट कायमचं बंद
3 करोनामुळे पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या- सोनू सूदची मागणी
Just Now!
X