उरी हमल्यानंतर पाकिस्तान आणि भारताच्या संबंधांमध्ये दुरावा आला. पाकिस्तानच्या या हरकतींना उत्तर देण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राइक केला होता. भारताच्या याच कारवाईला शाब्बासकी देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याची प्रशंसा केली आहे. जॉनने त्याला आपल्या साजेशा पद्धतीमध्ये एका व्हिडिओद्वारे त्याने जवानांची प्रशंसा केली आहे. त्याचा आगामी सिनेमा फोर्स २ मधले त्याने एक गाणे प्रदर्शित केले आहे.

सध्या देशात जी परिस्थिती आहे त्यावरच भाष्य करणारे ‘फोर्स २’ मधले ‘रंग लाल’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. हे गाणे भारतीय सैन्याची शौर्य गाथा गाणारे आहे. यात भारतावर कधीही कोणीही हल्ला करेल त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. मुंबईत आज हे गाणे लॉन्च करण्यात आले. गाण्यात लाल रंगाला एक प्रतीक मानले गेले आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि जॉन अब्राहम दिसत आहेत. या गाण्याला देवी नेगीसोबत जॉनचाही आवाज आहे. देशभक्तीपर संवादांमध्ये जॉनचा आवाज ऐकू येतो.

देशाच्या रक्षणासाठी प्राण देऊनही ओळख न मिळालेल्या शूरवीरांना हा चित्रपट समर्पित केल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीला दाखविण्यात आले आहे. जिथे ‘फोर्स’ चित्रपटाची कथा संपली होती. तिथूनच ‘फोर्स २’ ची कथा सुरु होईल असे म्हटले जातेय. काही दिवसांपूर्वीच जॉन आणि सोनाक्षी त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता कपिल शर्माच्या शोवर गेले होते.

‘फोर्स २’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॉन अब्राहमला ब-याचदा दुखापतींना सामोरे जावे लागले होते. त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिनदा सर्जरी करावी लागली होती. त्या दरम्यान त्याच्या दोन्ही हातांना आणि पाठीलाही दुखापत झालेली. या चित्रपटापूर्वी सोनाक्षी सिन्हाने ए आर मुर्गदास यांचा ‘अकिरा’ हा चित्रपट केला होता. यात तिने महिलांवर होणारा अत्याचार आणि हिंसा याविरुद्ध लढणा-या मुलीची भूमिका साकारली होती. तुम्ही यापूर्वीही असे चित्रपट पाहिले असतील. पण सोनाक्षीने या चित्रपटात दिलेले जबरदस्त असे अॅक्शन सीन हा यातील फरक होता.