27 February 2021

News Flash

‘जुळून येती रेशीमगाठी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

जाणून घ्या कधी आणि कुठे

एखादी व्यक्तिरेखा कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात आणि त्यानंतर थेट त्यांच्या मनात पोहचवते. कलाकार त्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग बनता. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. आता ही मालिका झी युवा वाहिनीवर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सुरू झाल्यापासून अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं फॅन फॉलॉविंग दिवसेंदिवस वाढत गेलं आणि प्रेक्षकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला. ललित आणि प्राजक्ता सोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेने देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.

ही मालिका आता पुन्हा एकदा पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. जुळून येती रेशीमगाठी मालिकेची लोकप्रियता पाहता झी युवा वाहिनीने या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणाचा निर्णय घेतला असून ही मालिका २७ जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता या वाहिनी वर सुरु झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 11:47 am

Web Title: julun yeti reshimgathi marthi most popular serial telecast again on zee yuva avb 95
Next Stories
1 “भट्ट कुटुंबीयांनी माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; अभिनेत्याचा खळबळजनक आरोप
2 सुशांत बायोपिक : स्टार किड्सला लाँच करणाऱ्या निर्मात्याची भूमिका साकारणार ‘हा’ मॉडेल
3 ऐश्वर्या-आराध्या करोनामुक्त; बिग बी म्हणाले…
Just Now!
X