पॉप स्टार जस्टीन बिबरचं फक्त नाव जरी घेतलं तरी तरुणींना वेड लागतं. कमी वयात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारा जस्टीन आज अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. जस्टीनने १३ व्या वर्षी ‘बेबी’ हे गाणं युट्यूबवर अपलोड केलं आणि अक्षरश: कोट्यवधी लोक त्याचे चाहते झाले. दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांचा आकडा वाढतोच आहे. जस्टीनचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी अनेकजण हजारो रुपये खर्च करतात. अशातच एका तरुणीने जस्टीन बिबरला नाकारलं असं म्हटल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

एका जिममधील तरुणीने चक्क जस्टीनला नाकारलंय. झालं असं की, जस्टीनने त्या तरुणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आणि तिच्याबाबत सोशल मीडियावरच विचारणा केली. ज्या जिममध्ये ती मुलगी वर्कआऊट करत होती त्या जिमच्या इन्स्टाग्राम पेजवर जस्टीनने तिच्याबद्दल विचारणा केली. ‘तुमच्या पोस्टमधील ही मुलगी कोण आहे?,’ असा प्रश्न त्याने विचारला. जेसिका गोबर असं त्या तरुणीचं नाव आहे. जस्टीनच्या या मेसेजचा स्क्रीनशॉट जेसिकाने तिच्या ट्विटरवर शेअर केलाय. हा स्क्रीनशॉट पोस्ट करत तिने लिहिलं की, ‘हे खरंच घडलंय का? जस्टीन बिबरने मी ज्या जिमला जाते तिथे मेसेज करून माझ्याबद्दल विचारलंय…हाहाहा!’ इतकंच नव्हे तर त्यानंतर तिच्या प्रियकरासोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, ‘मला जे हवं होतं ते सगळं मिळालंय.’

Happy Birthday Johnny Lever : विनोदाच्या बादशहाचे खळखळून हसवणारे हे व्हिडिओ बघाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिमच्या इन्स्टाग्राम पेजचे फक्त ७० फॉलोअर्स असताना आणि आतापर्यंत केवळ पाचच पोस्ट टाकल्यानंतर जस्टीनला ही पोस्ट अचानक कशी काय दिसली असा प्रश्नही जेसिकाने उपस्थित केलाय. तसेच त्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून पोस्ट केल्यानंतर अनेकांच्या टीकांना उत्तर देण्यासाठी प्रियकरासोबतचा फोटो टाकल्याचं स्पष्टीकरणही तिने दिलं.