News Flash

बॉक्स ऑफिसवर ‘कलंक’ची ५४ कोटींची कमाई!

२०१९ या वर्षातला प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हाचित्रपट ठरला आहे

करण जोहरचा मल्टिस्टारर ‘कलंक’ हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षक-समीक्षकांची संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी नवा विक्रम रचला होता. ‘कलंक’ने पहिल्या दिवशी तब्बल २१.६० कोटी रुपयांची कमाई केली. २०१९ या वर्षातला प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. त्यानंतर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी वाढत असून सलग चौथ्या दिवशी या चित्रपटाने ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘कलंक’ने पहिल्या दिवशी २१.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने ११ कोटी ४५ लाख रुपयांचा गल्ला जमविला. त्यानंतर सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ११ कोटी ६० लाख आणि ९कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाने तिकीटबारीवर एकूणच ५४ कोटी ४० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

दरम्यान, ‘कलंक’ने पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत ‘केसरी’ आणि ‘गली बॉय’लाही मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या ‘केसरी’ने पहिल्या दिवशी २१.०६ कोटी रुपयांचा तर रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ने १९.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘कलंक’ हा चित्रपट आलिया आणि वरुण यांचा एकत्रित सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील आलिया आणि वरुणच्या अभिनयाची स्तुती प्रेक्षकांकडून होत आहे. मात्र कथेत दम नसल्याचंही मत अनेकांनी मांडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 4:28 pm

Web Title: kalank 4 th day collection box office collection
Next Stories
1 #SriLanka : श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाविषयी बॉलिवूड कलाकार म्हणतात…
2 ‘मेंटल है क्या’ च्या शीर्षक वादात कंगनाच्या बहीणीची उडी
3 बहुप्रतीक्षित ‘जिवलगा’ या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X