25 January 2021

News Flash

काही मुस्लीम बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा का देतात; अभिनेत्याने केला सवाल

घराणेशाहीच्या वादात आता आणखी एका अभिनेत्याने घेतली उडी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सध्या जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर टीका होत आहे. त्यांच्या चित्रपटांवर डिसलाईकचा भडीमार होत आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता कमाल आर. खान याने देखील उडी घेतली आहे. काही मुस्लीम लोक घराणेशाहीला पाठिंबा का देतात? असा सवाल त्याने केला आहे.

अवश्य पाहा – बदला घ्यायला येतेय नवी ‘नागिन’; एकता कपूरने शेअर केले अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. “मला कळत नाही काही मुस्लीम प्रेक्षक बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा का देत आहेत? अर्जुन कपूर तुमच्या काकाचा मुलगा आहे का? वरुण धवन आणि आलिया भट्ट तुमच्या मावशीची मुलं आहेत का? कृपया मला तुमचा उद्देश सांगा.” अशा आशयाचं ट्विट केआरकेने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अवश्य पाहा – सासू-सुनेच्या भांडणावर रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

यापूर्वी कमाल ‘सडक २’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. फॉक्स स्टार हिंदीवर कायदेशीर कारवाई करेन असा धमकीवजा ईशारा त्याने दिला होता. “कृपया फॉक्स स्टार हिंदीने ‘सडक २’ साठी खोटे लाईक्स खरेदी करु नये. जर त्यांनी असे खोटे लाईक खरेदी करुन प्रेक्षकांना फसवण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करेन.” अशा आशयाचं ट्विट केआरकेने केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 6:47 pm

Web Title: kamaal r khan comments on favouritism and nepotism in bollywood mppg 94
Next Stories
1 दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट : ‘सुंदरा मनामध्ये भरली’
2 विजय देवरकोंडा दिसणार वेब सीरिजमध्ये?
3 ‘ये किस लाइन मे आ गए आप?’; सैफच्या आत्मचरित्रावरून भन्नाट मीम्स व्हायरल
Just Now!
X