03 March 2021

News Flash

कंगनाचा अप्रत्यक्षपणे आयुषमानवर निशाणा; म्हणाली, “चापलूस तर…”

कंगनाने केआरकेच्या ट्विटवर उत्तर दिले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दोषी समजले जात आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या प्रकरणी सध्या ईडी आणि CBI मार्फत चौकशी सुरु आहे. अशातच अभिनेता आयुषमान खुरानाने रियाला पाठिंबा दिला. त्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतने अप्रत्यक्षपणे आयुषमानवर निशाणा साधत संताप व्यक्त केला आहे.

कंगनाने कमाल आर खानने केलेल्या ट्विटवर उत्तर दिले आहे. “आयुषमानने रिया चक्रवर्ती आणि घराणेशाहीला पाठिंबा देण्यामागे तीन कारणं आहेत. एक – त्याला बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे आहे. दोन – तो यशराज फिल्म कंपनीसोबत काम करतोय. तीन – सुशांत त्याचा प्रतिस्पर्धी होता. चिंता करुन नकोस खुराना तुझे नवे चित्रपट येतायत. तुला प्रेक्षक चांगलाच धडा शिकवतील. ऑल द बेस्ट.” अशा आशयाचे ट्विट करुन केआरकेने आयुषमान विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- …तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न

या ट्विटर उत्तर देत कंगना म्हणाली, ‘चापलूस आउटसायडर्स केवळ एका कारणाने माफिया लोकांना पाठिंबा देत आहेत आणि ते कारण म्हणजे त्यांची विचार करण्याची सामान्य पद्धत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही धमकावत नाही. त्यामुळे ते या गोष्टीचा फायदा घेत कंगना आणि सुशांतसारख्या लोकांची खुलेआमपणे खिल्ली उडवतात.’ कंगनाने ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे आयुषमानवर निशाणा साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 9:56 am

Web Title: kangana ranaut slams ayushmann khurrana on sushant singh rajput suicide avb 95
Next Stories
1 दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा वाढदिवशी विश्वविक्रम
2 “दुसरा कुठला जॉब असेल तर सांगा”; बिग बींना वाटतेय करोनाची भीती
3 दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत मिळाल्याच्या वृत्तावर मुंबई पोलिसांनी केला खुलासा, म्हणाले…
Just Now!
X