21 September 2020

News Flash

हॉटस्टारच्या वादात कंगना रनौतची उडी; विद्युत जामवालला दिला पाठिंबा

हॉटस्टारच्या ऑनलाईन कॉन्फरन्सवर कंगना संतापली; म्हणाली...

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह सुरु होण्यास आणखी बराच वेळ लागणार आहे. परिणामी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांनी प्रदर्शनासाठी आता OTT प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला आहे. याच दरम्यान डिस्ने हॉटस्टारने एका ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून आगामी सात चित्रपटांची घोषणा केली. मात्र ही कॉन्फरन्स चित्रपटांपेक्षा त्यात सामिल न केल्या गेलेल्या कलाकारांमुळेच जास्त चर्चेत आहे. अभिनेता विद्युत जामवालने ट्विटरद्वारे या कॉन्फरन्सवर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या या ट्विटला आता अभिनेत्री कंगना रनौतने पाठिंबा दिला आहे. तिने देखील हॉटस्टारवर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – मस्तीखोर सुपरहिरो… पाहा शुटींगच्या वेळी तुमचे लाडके सुपरहिरो सेटवर कसा धिंगाणा घालतात

काय म्हणाली कंगना?

“किती शर्मेची बाब आहे एक आऊटसाईडरला अशा प्रकारे ट्रीट केलं जातंय. दु:खाची बाब म्हणजे स्वत: एक आऊटसाईडर असतानाही त्यांच्याकडून अशी वागणूक मिळतेय.” अशा आशयाचे ट्विट करुन कंगनाने नाराजी व्यक्त केली होती.

हॉटस्टारने आयोजित केलेल्या या डिजिटल कॉन्फरन्समध्ये अभिषेक बच्चन, अजय देवगन, आलिया भट्ट, वरुण धवन आणि अक्षय कुमार यांना सामिल केलं गेलं होतं. यावर विद्युत जामवाल संतापला होता. “ही नक्कीच एक मोठी घोषणा आहे. सात चित्रपट प्रदर्शित होणार आणि पाचच प्रतिनिधिंना तुम्ही बोलावलतं. दोन चित्रपट आणखी आहेत त्यामधील कलाकारांना तुम्ही विसरलात.” अशा आशयाचे ट्विट करुन वुद्युतने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 1:06 pm

Web Title: kangana ranaut slams ott platform for snubbing vidyut jammwal mppg 94
Next Stories
1 अक्षय कुमारने घराणेशाहीवर साधला निशाणा; मुलगा आरवला दिला सूचक इशारा, म्हणाला…
2 टिक-टॉक बॅनमुळे बेरोजगार झालेल्या कलाकारांचं काय होणार?; डेझी शाहला पडला प्रश्न
3 ‘त्या’ चित्रपटासाठी विद्या बालनला द्यावं लागलं तब्बल ७५ वेळा ऑडिशन; निवड होताच…
Just Now!
X