News Flash

आमदाराने केला दीपिका-रणबीरवर ड्रग्स सेवन केल्याचा आरोप, मिलिंद देवरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

या पार्टीमधील सत्य परिस्थिती मिलिंद देवरा यांनी सांगितली आहे

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने काही दिवसापूर्वी कलाविश्वातील सेलिब्रिटींसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. करणने दिलेल्या या पार्टीची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली. या पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी अमली पदार्थांचं सेवन केल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं होतं. यामध्ये आता राजकीय पक्षांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे. या पार्टीमधील एक व्हिडीओ अकाली दलाचे नेते मजिंदर सिरसा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीकास्त्रही सोडलं आहे. मात्र त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते मलिंद देवरा यांनी पार्टीमधील सत्य परिस्थिती सांगितली आहे.

‘हे आहे फिक्शन वर्सेस रिअॅलिटी. पाहा बॉलिवूड कलाकार असे गर्वाने अमली पदार्थांचं सेवन केल्याचं दाखवत आहेत. अशाप्रकारे अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या कलाकारांचा मी विरोध करतो. तुमचाही याला विरोध असेल,तर रिट्विट करा’,अशा आशयाचं ट्विट मंजिदर यांनी केलं होतं. सोबतच त्यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांना टॅगही केलं होतं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी ते रिट्विट करत उत्तर दिलं आहे.

‘माझी पत्नीदेखील त्या पार्टीमध्ये उपस्थित होती आणि या व्हिडीओमध्येदेखील ती दिसून येत आहे. या पार्टीमध्ये कोणत्याही कलाकाराने अमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं. त्यामुळे उगाच अफवा पसरवणं बंद करा. मी आशा करतो की याप्रकरणी तुम्ही माफी मागण्याचं धाडस कराल’, असं उत्तर मिलिंद देवरा यांनी दिलं.

दरम्यान, करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये दीपिका पदुकोण रणबीर कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन, विक्की कौशल, मलायका अरोरा, शाहिद कपूर, मीरा राजपूत, जोया अख्तर, अयान मुखर्जी ही कलाकार मंडळी उपस्थित होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 11:29 am

Web Title: karan house party alleges akali dal leader gets slammed milind deora tweet ssj 93
Next Stories
1 हा त्रिवेदी कोण आहे? विचारत आमिरने केला सैफला मेसेज
2 Video : ‘उन्नाव सामूहिक बलात्काराची कथा एखाद्या बॉलिवूडपटासारखी’, पायल रोहतगी पुन्हा बरळली
3 Photo : प्रियकराच्या आठवणीत संजय दत्तची मुलगी भावूक
Just Now!
X