News Flash

करन जोहरच्या मुलाला व्हायचं आहे शाहरुख खान; शेअर केला ‘शाहरुख’ लूक

इन्स्टाग्रामवर शेअर केला हा व्हिडिओ

दिग्दर्शक, निर्माता करन जोहर सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. आपल्या मुलांसोबत मस्ती करतानाचे, मुलांच्या कौतुकाचे व्हिडिओज तो कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सध्या करनने त्याच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. काय आहे ह्या व्हिडिओत?

करन जोहरचा मुलगा यश याचा एक व्हिडिओ करनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अपलोड केला आहे. यात यशने काळ्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि त्याला मॅचिंग असे शूज घातले आहेत. आणि विशेष म्हणजे यशने आपल्या गळ्यात शाहरुख खानसाऱखं लॉकेटही घातलेलं आहे.

शाहरुखने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात ज्याप्रमाणे COOL अशी अक्षरं असलेलं लॉकेट घातलं होतं. तसंच आज यशनेही घातलं आहे. त्यावर करनने शाहरुखला टॅग करून लिहिलं आहे, “भाई, हे तुझ्यासाठी.” हे लॉकेट घालून यश मोठ्याने ओरडतानाही दिसत आहे. “डॅड, आय एम कूल” असं तो करनकडे पाहून म्हणत आहे.

नुकताच करनने त्याची मुलगी रुहीचा यशसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात रुही यशची आई झाली होती आणि यश तिच्या मांडीवर झोपला होता. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते भलतेच खूश झाले होते.

करनने नुकतंच आलिया भटच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी एक पार्टी दिली होती. ज्यात दिपिका पादुकोन, रणवीर सिंग, अयान मुखर्जी, मलाइका अरोरा, अर्जुन कपूर आणि इतर कलाकारांनीही हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 1:13 pm

Web Title: karan johars son wants to be like shahrukh khan vsk 98
Next Stories
1 गौहर खानला नियम तोडणं चांगलंच भोवलं; FWICE कडून मोठी कारवाई
2 हृतिक रोशनचं कोणाकडे आहे एवढं लक्ष?; चाहत्यांच्या या भन्नाट कमेंट्स वाचाच
3 तेलुगू सुपरस्टार नागार्जुनने घेतली लस
Just Now!
X