News Flash

‘सैफ आणि शाहिदसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर’? करणच्या प्रश्नावर करीनाचं भन्नाट उत्तर

करीनाने काय उत्तर दिलं असेल

कधीकाळी कलाविश्वामध्ये लव्हबर्ड्स म्हणून शाहिद कपूर आणि करीना कपूरकडे पाहिलं जायचं. २००४ साली ‘फिदा’ चित्रपटातून सुरुवात झालेल्या या प्रेमकथेचा जब वी मेट चित्रपटापर्यंत अंत झाला. हे दोघं विभक्त झाले आणि त्यांनी आपआपल्या वेगळ्या वाटा निवडल्या. आज शाहिदने मीरा राजपूतसोबत लग्न केलं आहे. तर करीनाने सैफ अली खानसोबत संसार थाटला आहे. मात्र आजही शाहिद आणि करीना यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगतात. सध्या करीनाची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यात दिग्दर्शक करण जोहर करीनाला सैफ आणि शाहिदविषयी काही प्रश्न विचारताना दिसतो.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यातच करीना कपूर खाननेदेखील हजेरी लावली होती. २०१७ साली सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना रणौत यांची मुख्य भूमिका असलेला ‘रंगून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खान ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर पत्नी करीना कपूर खान सोबत गेला होता. त्यावेळी करणने करीनाला शाहिद आणि सैफविषयी काही प्रश्न विचारले होते. मात्र करीनानेदेखील मजेशीर अंदाजात या प्रश्नांची उत्तरं दिली.

“जर तू, पती सैफ अली खान आणि शाहिद कपूर एकत्र लिफ्टमध्ये अडकलात तर तेव्हा तुझी नेमकी प्रतिक्रिया काय असेल?”, असा प्रश्न करणने करीनाला विचारला. त्यावर करीनाने मजेशीर अंदाजात याचं उत्तर दिलं. “हे खरंच फार भन्नाट असेल. त्या दोघांनी ‘रंगून’मध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र या चित्रपटात मी अभिनेत्री नसल्यामुळे मला त्याची खंत आहे”, तिचं हे मजेशीर अंदाजातलं उत्तर ऐकून करण आणि सैफ दोघंही चक्रावून गेले.

दरम्यान, ‘जब वी मेट’ चित्रपटाची शूटिंग संपताना करीना आणि शाहिदमधील दुरावा वाढला. चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील गप्पा कमी झाल्या होत्या. इतकंच नाही तर शेवटचा सीन शूट करताना दोघेही वेगवेगळ्या गाडीने सेटवर आले. अभिनेत्री अमृता रावसोबत शाहिदची जवळीक वाढल्या कारणाने करीना आणि शाहिदमध्ये दुरावा वाढला असे म्हटले जाते. तर दुसऱ्या बाजून करीना आणि सैफ अली खानसुद्धा एकमेकांजवळ येऊ लागले होते. २००७ मध्ये जेव्हा करीना ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सैफसोबत दिसली तेव्हा शाहिद-करीनाच्या ब्रेकअपच्या बातमीची खातरजमा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 11:51 am

Web Title: kareena kapoor on ex boyfriend shahid kapoor husband saif ali khan in karan johar show koffee with karan ssj 93
Next Stories
1 मराठी कलाकारांच्या कुटुंबातील करोना योद्धे; जीवाची पर्वा न करता देतायत लढा
2 लॉकडाउनमध्ये बिपाशाची विनामेकअप लूकला पसंती
3 मदतकार्य पाहून भारावला विकास खन्ना; सोनू सूदसाठी तयार केली खास ‘मोगा डिश’
Just Now!
X