News Flash

T20 World Cup 2020 : करिना कपूरच्या हस्ते विश्वचषकाचं अनावरण

ऑस्ट्रेलियात रंगणार स्पर्धा

२०२० साली ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं बिगुल वाजलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या हस्ते या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. शुक्रवारी मेलबर्नमध्ये हा छोटेखानी सोहळा पार पडला. २१ फेब्रुवारीपासून महिला टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार असून पुरुष संघांचा विश्वचषक १८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

“विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण माझ्या हस्ते झालं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. विशेषकरुन या सर्व महिला क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवायला मला आवडेल. आपल्या देशासाठी त्या जे काम करत आहेत, ते खरंच प्रशंसनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणं हे नेहमी स्वप्नवत असतं.” करिनाने यावेळी स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अवश्य वाचा –  T20 World Cup 2020 : ‘या’ १६ संघांना मिळालं विश्वचषक स्पर्धेचं तिकीट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 2:26 pm

Web Title: kareena kapoor unveils world t20 trophies in melbourne psd 91
Next Stories
1 ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन आरोप करणं चुकीचं – एम.एस.के. प्रसाद
2 धोनीने आता निवृत्त व्हावं का? रोहित शर्मा म्हणतो…
3 तुम्ही राईचा पर्वत केलात ! अनुष्का बद्दलच्या वक्तव्यावर फारुख इंजिनीअर यांनी मागितली माफी
Just Now!
X