News Flash

‘दोस्ताना २’मध्ये पहिल्यांदाच जमणार जान्हवी-कार्तिकची जोडी

या चित्रपटामध्ये अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती

जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन

धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला ‘दोस्ताना’ हा चित्रपट २००८ साली प्रेक्षकांच्या भेटीला होता. प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातून पहिल्यांदाच एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आला. या चित्रपटातील ‘देसी गर्ल’ हे गाणं विशेष गाजलं होतं. त्यासोबतच अभिषेक बच्चन आणि जॉनचं चुंबन दृश्यदेखील विशेष चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये कोणत्या नव्या कलाकारांची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी कलाविश्वातील अनेक नावांची चर्चादेखील झाली होती. मात्र आता या चित्रपटासाठी दोन कलाकारांची नावे फायनल करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटामध्ये अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचं नावही चर्चेत होतं. मात्र आता या चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांना फायनल करण्यात आलं आहे. धर्मा प्रोडक्शनने त्यांच्या ऑफिशिअर ट्विटरवर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

 “दोस्तानाची फ्रेंचाइजी कार्तिक आणि जान्हवी यांच्यासोबत पुढे जात आहे. मी या चित्रपटासाठी प्रचंड उत्साहीदेखील आहे. धर्मा प्रोडक्शनसोबत पहिल्यांदाच कार्तिक आर्यन काम करणार आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य भूमिकेसाठी नवा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहे. कॉलिन डी कुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत”, असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘धडक’ या चित्रपटामध्ये जान्हवीने वठविलेल्या भूमिकेमुळे तिचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. तर कार्तिकने देखील विविध भूमिका वठवून कलाविश्वामध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या दोघांची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. या दोघांव्यतिरिक्त आता चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कोणता कलाकार झळकणार याकडे साऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 11:56 am

Web Title: kartik aaryan and janhvi kapoor have been finalised as the leads of dostana 2 ssj 93
Next Stories
1 अवघे काही किलो वजन वाढल्यामुळे मी गमावली ‘ती’ भूमिका, राधिकाची खंत
2 अर्जुन कपूरसोबतचा फोटो शेअर करत मलायकाने दिली प्रेमाची कबुली
3 सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतील विकी कौशलचा दमदार लूक पाहिलात का?
Just Now!
X