News Flash

कविता कौशिक ‘बिग बॉस’ला म्हणाली ‘फेक रिअ‍ॅलिटी शो’; “शोमुळे माझी..

"एकदा तुमचं नाव खराब झालं की तुम्ही मुक्त होता."

अभिनेत्री कविता कौशिक तिच्या बिनधास्त आणि तडफदार अंदाजासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच कविताने बिग बॉसच्या 14 व्या पर्वात सहभागी होतं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यावेळी ती काही वेळा ट्रोलही झाली. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर कविताला बिग बॉसच्या शोमध्ये जाऊन चूक केल्याचं वाटू लागलं आहे. या शोमुळे तिची ईमेज खराब झाल्याचं तिला वाटतंय.

कविता कौशिकने तिचं बिग बॉसमध्ये जाणं चूक असल्याचं म्हणत. बिग बॉस शो फेक असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. कविता कौशिकने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती योगासन करताना दिसतेय. ” कशावरही नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय.

कविताच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. या व्हिडीओवर कविताच्या एका चाहत्याने कमेंट करत म्हंटलं आहे, ” तुम्ही बिग बॉस शो मध्ये सहभागी व्हायला नको होत. मला माहित नाही पण या शोमुळे तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम झाला आहे. मी तुमचा चाहता आहे आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी कायम प्रार्थना करीन.” असं चाहत्याने म्हणताच कविताने लगेचच त्याला उत्तर दिलं आहे.

कविताने चाहत्याला उत्तर देताना म्हणाली, “ते ठिक आहे, म्हणतात ना एकदा तुमचं नाव खराब झालं की तुम्ही मुक्त होता. मी अश्यांकडे अजिबात लक्ष देत नाही जे एखाद्याला फेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहून प्रेम करतात किंवा त्याचा द्वेष करतात.”

FIR या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेमुळे कविता कौशिकला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. एकता कपूरच्या ‘कुटुंब’ या मालिकेतून तिने करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘कहानी घर-घर की’, ‘कुसुम’, ‘पिया का घर अशा अनेक मालिकांमधून ती झळकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 12:40 pm

Web Title: kavita called bigg boss a fake reality show it spoiled her image kpw 89
Next Stories
1 सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला धक्का , नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
2 “आता याला कोणती फॅशन म्हणतात ?”, या व्हिडीओमुळे उर्वशी रौतेला ट्रोल
3 “..आणि ही दुसऱ्यांना शिकवते”; मास्क न घातल्याने सारा अली खान ट्रोल
Just Now!
X