छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय स्टंटवर आधारित शो म्हणजे ‘खतरों की खिलाडी.’ सध्या शोचा ११ वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनमध्ये श्वेता तिवारी, निक्की तंबोळी, दिव्यांका त्रिपाठी, राहुल वैद्य आणि इतर काही स्पर्धक दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये निक्की तंबोळी आणि श्वेता तिवारीमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दिव्यांकाने दिलेल्या उत्तराने रोहित शेट्टीला एम्प्रेस केले आहे.

खतरों के खिलाडी ११मध्ये स्पर्धकांना काही टास्क देण्यात आले होते. त्यासाठी स्पर्धकांना दोन टिम राहुल वैद्यची टीम आणि श्वेता तिवारीची टीम यांमध्ये विभागण्यात आले. दोन्ही टीम एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. राहुलच्या टीममध्ये निक्की तंबोळी असल्याचे पाहायला मिळते. राहुलची टीम एक टास्क देखील जिंकते. त्यानंतर श्वेता एलिमिनेशन स्टंटसाठी दोन स्पर्धकांची नावे घेण्यास सांगण्यात येतात. पण श्वेताला कोणत्या स्पर्धकाचे नाव घेऊ असा विचारत करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान श्वेताने विशाल आदित्य सिंहवर नाराजी व्यक्त केली. तसेच निक्की तंबोळीचे देखील श्वेताने नाव घेते. त्यावेळी ती म्हणाली, ‘निक्कीने या सिझनमध्ये स्टंट चांगले परफॉर्म केले नाहीत. तरी देखील ती शोमध्ये आहे. कारण ती जिंकणाऱ्या टीमचा भाग आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वेताचे बोलणे ऐकून निक्की संतापते. ‘तिचे डोकं ठिकाणावर नाही. ती माझ्यावर जळते. जेव्हा मी अभिनवसोबत पाण्याचा स्टंट केला तेव्हा देखील तिने माझी प्रशंसा केली नाही’ असे निक्की म्हणाली. त्या दोघींचे भांडण पाहून दिव्यांकाने निक्कीवर कमेंट केली आहे. ‘तू खूप क्यूट आहेस. तुझ्याशी लढायची पण इच्छा नाही’ असे म्हटले. दिव्यांकाचा डायलॉग ऐकून रोहीत शेट्टी देखील इम्प्रेस झाला.