अभिनेता कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी देशाला ७० वर्ष मागे घेऊन गेले अशा शब्दात त्याने टीका केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – मेडिकलमधून दारु खरेदी केली का?; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अभिनेत्री म्हणाली…

“काँग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षांमध्ये काहीही केलेलं नाही. त्यामुळे मोदीजी आधी देशाला ७० वर्ष मागे नेणार आणि मग सुरुवातीपासून देशाचा विकास सुरु करणार. वा मोदीजी. मला तुमची काम करण्याची पद्धत खूप आवडली.” अशा आशयाचे ट्विट करुन कमाल खानने मोदींवर टीका केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – सलमानसोबत लग्न कधी करणार?; चाहत्यांच्या प्रश्नावर लुलीया म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक भाषणांमधून काँग्रेस पक्षावर टीका करत असतात. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने देशाला काय दिलं? हा प्रश्न ते वारंवार विचारतात. या पार्श्वभूमीवर कमाल खानने मोदींना हा उपरोधिक टोला लगावला आहे. कमाल आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचे हे देखील ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.