01 March 2021

News Flash

‘दबंग ३’ सुपरफ्लॉप म्हणत केआरकेची सलमानवर टीका

हा सध्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट आहे

सध्याचा बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे सलमान खानचा ‘दबंग ३.’ काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. चाहत्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी ‘मुन्ना बदनाम हुआ’ गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये सलमान आपल्या दबंग अंदाजात नृत्य करताना दिसत आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्याचा टीझर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण ‘दबंग ३’ चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खानला फारशी भावली नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याने ट्विटरद्वारे चित्रपटासंबंधीत भविष्यवाणी केली आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये ‘दबंग ३’चा ट्रेलर सुपर फ्लॉप आहे. तसेच चित्रपटातील गाणीदेखील फ्लॉप आहेत. केवळ रिक्षाचालक चित्रपट पाहण्यासाठी जातील. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त १५० कोटींची कमाई करु शकतो. म्हणजेच हा चित्रपट सुपरफ्लॉप असणार असे लिहीत बोचरी टीका केली आहे.

‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 8:44 am

Web Title: krk says that dabbang 3 is going to super flop avb 95
Next Stories
1 पोल डान्समुळे ‘ही’ मराठमोळी आली होती चर्चेत
2 सलमानचा आवाज, चुलबुलचा कडक अंदाज; ‘दबंग-३’ मधील गाण्याचा टिझर रिलीज
3 ‘नींद चुराई मेरी किसने ओ सनम’; अजयच्या ट्विटवर काजोलचे भन्नाट उत्तर
Just Now!
X