01 March 2021

News Flash

हल्लीच्या मुलीच म्हणतात, काहीही करा पण आम्हाला काम द्या; कास्टिंग काऊचविषयी राखी सावंतचा धक्कादायक खुलासा

हल्लीच्या तरुण मुली कोणत्याही पातळीवर जाऊन तडजोड करण्यासाठी तयार असतात असा धक्कादायक खुलासाही तिने केला.

राखी सावंत

‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत हिने पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर राखी सावंत हिने आता आपलं मतही मांडलं आहे. ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी कास्टिंग काऊचच्या विषयाला अनुसरुन केलेल्या वक्तव्याला तिने दुजोरा दिला. त्यासोबतच तिने आपल्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊचच्या प्रसंगाविषयीसुद्धा सांगितलं. आपण अशाही काही मुलींना ओळखते ज्या स्वत:हून निर्मात्यांकडे शारीरिक संबंधाची विचारणा करतात असा खळबळजनक खुलासाही तिने केला.

‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटसृष्टीत कोणी कोणाचा बलात्कार करत नाही, असं राखीने स्पष्ट केलं. ‘इथे कोणीच कोणाचा बलात्कार करत नाही. हे सर्व परस्पर संमतीने होतं. या बाबतीत मी सरोजजींना पूर्णपणे पाठिंबा देते. कमीत कमी त्यांनी ठामपणे आपलं मत मांडलं. चित्रपटसृष्टीतील लोकांसमोरच कास्टिंग काऊचच्या घटना घडतात पण, तरीही त्याविषयी ते काहीच बोलत नाहीत. आपल्या वाटेत तर या गोष्टी येत नाहीत ना, मग त्याविषयी का मतप्रदर्शन करावं, याच विचारसरणीचे लोक इथे जास्त आहेत’, असं राखी म्हणाली.

हल्लीच्या तरुण मुली कोणत्याही पातळीवर जाऊन तडजोड करण्यासाठी तयार असतात असा धक्कादायक खुलासाही तिने केला. ‘हल्लीच्या मुली तर काहीही करा पण आम्हाला काम मिळवून द्या, असंच म्हणत असतात. यामध्ये चित्रपट निर्मात्यांची काय चूक. सरोज खान काय चुकीचं बोलल्या. आजवर या कलाविश्वात किती तरुणी अभिनेत्री होण्याच्या उद्देशाने आल्या पण, सर्वांनाच ते शक्य झालं नाही. मला काय म्हणायचंय याचा अर्थ तुम्हाला कळतच असेल. आता याला नशीब म्हणा किंवा आणखी काही, पण हेच सत्य आहे’, असंही ती म्हणाली.

वाचा : त्याने मला स्पर्श करण्यास सुरुवात केली अन्…, कास्टिंग काऊचबाबत मराठी अभिनेत्रींनी केला धक्कादायक खुलासा

तरुण आणि होतकरु कलाकारांनी त्यांच्या कौशल्यावर विश्वास ठेवून न डगमगता आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात पुढे जात रहावं, असा संदेश तिने दिला. कारकिर्दीत सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपणही कास्टिंग काऊचचा सामना केल्याचं तिने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 9:31 am

Web Title: kuch bhi kar lo mujhe kaam de do actress rakhi sawant makes shocking statements on casting couch in bollywood
Next Stories
1 ‘विठूमाऊली’मध्ये उलगडणार पुंडलिकाच्या भक्तीचा महिमा
2 Video : ‘वाघेऱ्या’ गावात वाघाने घातला धुमाकूळ
3 बॉलिवूडचा सिंघम ‘या’ आजाराने त्रस्त
Just Now!
X