News Flash

“‘भीगे होठ तेरे..’ गाणं गाताना मी…”; कुणाल गांजावालाने सांगितला अनुभव

वाचा, नेमकं रेकॉर्डिंगच्या वेळेस काय झालं होतं?

२००४ साली प्रदर्शित झालेला अनुराग बासू यांचा ‘मर्डर’ हा चित्रपट अनेकांच्या लक्षात असेल. अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट अत्यंत बोल्ड दृश्य आणि त्यातील गाण्यामुळे चर्चेत आला होता. त्यातील भीगे होंठ तेरे हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला याच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं होतं. मात्र हे गाणं गाण्यापूर्वी कुणालला प्रचंड टेन्शन आल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत कुणालने या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा अनुभव सांगितला आहे. “ज्यावेळी मला या गाण्याची विचारणा करण्यात आली. त्यावेळी मी गाण्याचे बोल ऐकून दोन मिनीटं स्तब्धच झालो होतो. मला त्यावेळी खरंच या शब्दांची भीती वाटली होती. या चित्रपटात नेमकं कोण काम करतंय हेदेखील मला माहित नव्हतं.तसंच या गाण्याची तयारी करण्यासाठीदेखील मला वेळ मिळाला नाही, मला फक्त इतकंच सांगण्यात आलं की हे गाणं अत्यंत रोमॅण्टीक अंदाजात गायला हवं. त्यामुळे जेव्हा मी खऱ्या अर्थाने हे गाणं हातात घेतलं तेव्हा नर्व्हस झालो होतो”, असं कुणालने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “मी या गाण्याच्या सरावासाठी काही वेळ मागितला होता. मात्र निर्मात्यांनी तो दिला नाही. मी २० मिनीटांत हे गाणं तयार करुन ते रेकॉर्डदेखील केलं. या संगीत क्षेत्रात मी कधी करिअर करु शकेन असं वाटलंदेखील नव्हतं. कारण मला कधीच पार्श्वगायक व्हायचं नव्हतं. तसंच मी उत्तमरित्या गाणं म्हणू शकतो यावरही माझा विश्वास नव्हता. मात्र या गाण्यानंतर मी अनेक गाणी गायली आणि अनेक दिग्गजांनी मला ती संधीदेखील दिली”.

दरम्यान, ‘मर्डर’ हा चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी यांची मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे हा चित्रपट कथानकापेक्षा त्याच्यातील बोल्ड सीनमुळे सर्वाधिक चर्चिला गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:40 pm

Web Title: kunal ganjawala says that he was quite scared before singing the song from murder ssj 93
Next Stories
1 ‘अशा लोकांना…’, मनोज वाजपेयीने साधला केआरकेवर निशाणा
2 सुशांतच्या एक्स मॅनेजरला ओळखत नाही; प्रेमप्रकरणाच्या आरोपांवर सूरज पांचोलीची प्रतिक्रिया
3 सलमान-सोहेल-अरबाजमध्ये कोणाची निवड करणार? लूलियाने दिले भन्नाट उत्तर
Just Now!
X