15 August 2020

News Flash

Video : कुणाल खेमूच्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर प्रदर्शित

खळखळून हसायला लावणारा 'लुटकेस'चा ट्रेलर

‘गोलमाल 3′,’कलियुग’ या सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता कुणाल खेमू लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लुटकेस’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुणालने सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर करत ही माहिती दिली.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता चित्रपट प्रदर्शनाची ओढ लागली आहे. या चित्रपटात अभिनेता कुणाल खेमू मुख्य भूमिकेत झळकणार असून हा कॉमेडी चित्रपट असल्याचं दिसून येत आहे.

या चित्रपटाची कथा एक पैशाने भरलेल्या बॅगभोवती फिरत असल्याचं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून लक्षात येत आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित हा चित्रपट डिझ्नी हॉटस्टारवर ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कुणालसोबत रसिका दुगल, रणवीर शौरी, विजय राज हे कलाकार झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 5:09 pm

Web Title: kunal khemu starrer lootcase trailer release ssj 93
Next Stories
1 ‘या’ कारणासाठी सुशांतच्या बहिणीची पुन्हा एकदा होणार पोलीस चौकशी
2 सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने मागितली अमित शाह यांची मदत, म्हणाली…
3 ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’च्या प्रदर्शनावर बंदी आणा; ठाकरे सरकारची केंद्राला विनंती
Just Now!
X