News Flash

‘या’ दिवशी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार करण जोहरचा ‘Liger’

करण जोहरने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती...

‘या’ दिवशी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार करण जोहरचा ‘Liger’

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे नाव ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ असे आहे. आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

नुकताच करण जोहरने ट्विटरद्वारे ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. ‘Liger हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे ट्विट केले आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये विजय देवरकोंडा अनोख्या स्टाइलमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा फायटरच्या रुपात दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 1:01 pm

Web Title: liger karan johar announces theatrical release date avb 95
Next Stories
1 ‘ट्विट’वॉर! मेरिल स्ट्रीपने किती राष्ट्रीय पुरस्कार मिळवले? कंगनाचं ट्विट नेटकरी म्हणाले…
2 ‘तिने माझ्या पोटावर लाथ मारली’, फराह खानचा शिल्पा शेट्टीवर आरोप
3 कंगनाची माघार; बीएमसीविरोधातील याचिका मागे
Just Now!
X