News Flash

‘गुलाब गँग’ चित्रपटातील भूमिकेने माधुरी खुश!

माधुरी जवळपास सहा वर्षांनी अभिनयक्षेत्रात 'गुलाब गँग' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. ती नुकतीच 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात रणबीरसोबत आयटम साँगमध्ये थिरकताना दिसली होती.

| July 7, 2013 05:54 am

माधुरी दीक्षित

माधुरी जवळपास सहा वर्षांनी अभिनयक्षेत्रात ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. ती नुकतीच ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात रणबीरसोबत आयटम साँगमध्ये थिरकताना दिसली होती.
“या चित्रपटाचा मी एक भाग असल्याचा मला आनंद होत आहे. हा एक चांगला चित्रपट आहे. जेव्हा सौमिक सेनने(दिग्दर्शक) चित्रपटाची कथा वाचून दाखविली तेव्हा मी त्याला नकार देऊच शकले नाही. चित्रपटात स्त्रीला प्रमुख भुमिका देण्यात आली आहे. प्रेक्षकांना माझी एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. एका आक्रमक महिलेची भूमिका मी केली आहे. यात मला काही स्टंट करण्याचीही संधी मिळाली.”, असे माधुरी म्हणाली. माधुरी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच जुही चावलासोबत काम करताना दिसणार आहे. ‘गुलाब गँग’व्यतिरिक्त माधुरी नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसीसोबत ‘देढ इश्किया’मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 5:54 am

Web Title: madhuri dixit glad to play a strong character in gulab gang
Next Stories
1 ‘२ स्टेट्स’ चित्रपट १८ एप्रिलला होणार प्रदर्शित
2 ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांकाचा कॅब्रे
3 हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण
Just Now!
X