भारतभरात आज ११ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. बॉलिवूड कलाकरांपासून ते छोट्या पडद्यावरील कलाकारांपर्यंत सर्वजण सोशल मीडिया पोस्टद्वारे महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोनू सूदने सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने, ‘भगवान शंकराचा फोटो फॉरवर्ड करुन नाही, तर कोणाची तरी मदत करुन महाशिवरात्री साजरी करा’ असे म्हटले आहे.

a young man told a list of reasons why he can not leave Pune
Pune : “मी पुणे सोडू शकत नाही” ‘ही’ कारणे देत तरुणाने स्पष्टच सांगितले, पाहा Viral Video
Mahayuti candidate Shrirang Barne reacts on What will be the challenge of the opposition candidate
पिंपरी : विरोधी उमेदवाराचे आव्हान किती असेल? महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, उमेदवार कोण…!
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

कुणाल खेमुने देखील कुटुंबीयांसोबतचा फोटो शेअर करत सर्वांना महाशिवत्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटो शेअर करत ‘महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

जाणून घ्या महाशिवरात्रीचं महत्त्व

काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना १६ सोमवारांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महाशिवारात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडी अडचणी दूर होतात, महादेव प्रसन्न होतात. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय.