भारतीय संगीत प्रभावशाली असून ते २४ कॅरेट सोने आहे. पण त्याला थोड़ी झळाळी देऊन या सोन्याचा नवीन दागिना तयार करुन नवीन पिढीला दिला तर हे संगीत तरुणांपर्यंत नक्कीच चांगल्या प्रकारे पोहोचेल. सृष्टीमधील सर्व जीवांना माझे गाणे ऐकवायचे आहे, अशी इच्छा जागतिक किर्तीचे शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

लोकसंगीताला सर्वाधिक पसंती असल्याने शास्त्रीय संगीताला त्यामानाने रसिक वर्ग कमी आहे. लोकसंगीताच्या तुलनेत शास्त्रीय संगीत प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम आताच्या प्रसारमाध्यमांनी केले पाहिजे. शास्त्रीय संगीताला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माझे स्वप्न आज वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमुळे शक्य झाले आहे. जगभर शास्त्रीय संगीत पोहचवण्यासाठी परदेशातील विविध गायकांसोबत विविध प्रयोग सादर केले. त्यामुळे आता जगात देखील शास्त्रीय संगीताची ओळख होऊ लागली आहे. संगीताकडे आलो नसतो तर क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी नक्कीच केली असती, असे काळे यांनी आवर्जून सांगितले. पण सध्या संगीत हेच मझे आयुष्य आहे आणि संगीतातच मला जगायला आवडेल असे काळे म्हणाले.

आभियांत्रिकी शिक्षण घेतलेले महेश यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून प्रेक्षकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे आई-वडीलांचे आभार कधीच मानता येत नाहीत त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीतातील धडे घेतलेल्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांचेदेखील आभार मानता येणार नाहीत. पुरस्कार मिळाल्यानंतर आई आणि माझे गुरु हा मिळालेला पुरस्कार बघण्यासाठी नव्हते ही भावना माझ्यासाठी सर्वात दुख:दायी होती, असे बोलताना काळे भावूक झाले. काळे यांनी तरुणांना संदेश दिला की, स्वप्न बघा पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी काळे यांचा सत्कार केला.