बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मलायका अरोराचा आज ४६ वा वाढदिवस. मलायकाने या वयातही स्वत:ला प्रचंड फिट ठेवलं आहे. त्यामुळे तिच्याकडे पाहिल्यानंतर वय हा फक्त आकडा हे लक्षात येतं. मलायका तिचा वाढदिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करत आहे. तिच्या या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेकांनी हजेरी लावली असून अभिनेता अर्जुन कपूर बेभान होऊन नाचल्याचं पाहायला मिळालं.

वाढदिवस असल्यामुळे मलायकाने एका पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीमध्ये तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या पार्टीमधील अर्जुनचा उत्साह पाहण्यासारखा होता.सध्या सोशल मीडियावर अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

पार्टीमध्ये मलायकाने स्पार्कल शॉर्ट ड्रेस घातला असून यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या पार्टीमध्ये करिश्मा कपूर, अनन्या पांडे, तारा सुतारिया, जान्हवी कपूर, राजकुमार राव, अर्जुन रामपाल, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना या कलाकारांनी हजेरी लावली.