बॉलिवूडमधील सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटपटू कोण कधी ट्रोलर्सच्या निशाण्यावर येईल सांगता येत नाही. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री मलायका अरोराबरोबर. आपल्या बोल्ड लूक आणि आयटम साँग्समुळे कायमच चर्चेत असणारी मलायका आता चर्चेत आली आहे ती तिच्या शर्ट ड्रेसमुळे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो मलायकाचे फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकांनी तिला या फोटोंवरुन ट्रोल केलं आहे.

झालं असं की रविवारी मलायका आपल्या बहिणीकडे गेली होती. रात्री उशीरा बहिणीच्या घरुन जेवण करुन निघताना मलायकाला फोटोग्राफर्सने आपल्या कॅमेरात टिपले. या फोटोंमध्ये मलायका पांढऱ्या रंगाचा शर्ट ड्रेस, हाय हिल्सचे शूज आणि डोक्यावर हॅट अशा ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोग्राफर्सला पाहून तिने त्यांच्याकडे पाहत स्माइलही दिली. तिचे हेच फोटो मानव मंगलानी या फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले. मात्र अनेकांना मलायकाचा पांढऱ्या रंगाचा शर्ट ड्रेस फारसा आवडला आणि त्यावरुनच ती ट्रोल झाली. अनेकांनी मानवच्या या पोस्टवर मलायकाला या शर्ट ड्रेसवरुन ट्रोल केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#MalaikaArora snapped post dinner at #amritaarora house today #sunday #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

अनेक युझर्सने या फोटोवर कमेंट करुन मलायका पॅण्ट घालायला विसरलीय का असा सवाल केला. एका युझरने, ‘ही पँट घालायला विसरलीय’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युझरने, ‘हिने नक्की काय घातलं आहे? पँट घालायला विसरलीय का?’ असा सवाल केला. तर काहींनी हिला ट्राऊझर पँट दान करा असंही म्हटलं आहे. तर एका युझरने मलायकाला वयाचा विचार करुन कपडे निवडण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टवर नकारात्मक कमेंटचा पाऊस पडला असला तरी काहींनी तिच्या या लूकचे कौतुकही केल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे. काहींनी हे शर्ट अर्जून कपूरचं आहे का असा सवालही तिला केला आहे.

 

याआधीही ट्रोलर्सने मलायकावर टीका केल्याचे पहायला मिळाले आहे. अर्जुन कपूरसोबतचं नात्यावर असो किंवा बोल्ड फोटोशूटवरुन असो मलायका कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते.