05 June 2020

News Flash

आता घरबसल्या तयार करा मास्क; अभिनेत्याने सांगितली सोपी पद्धत

घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणं आता अनिवार्य केलं आहे.

देशभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. या प्राणघातक विषाणूची लागण होऊ नये म्हणून सरकारने मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. परिणामी मास्कची मागणी आणि किंमत यांच्यात कमालीची वाढ झाली आहे. परंतु आता मास्कवर अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण अभिनेता इंद्रान्स यांनी घरबसल्या मास्क तयार करण्याचा एक सोपी टेकनिक सांगितली आहे. त्यांनी एका व्हिडीओमार्फत माक्स तयार करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

इंद्रान्स हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता आहेत. केरळ सरकारने करोना विरोधात पुकारलेल्या ‘ब्रेक द चैन’ या अभियानात त्यांनी भाग घेतला आहे. त्यांनी यापूर्वी पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली होतीच, पण आता देशभरातील लोकांना ते घरबसल्या मास्क तयार करण्याची सोपी पद्धत शिकवत आहेत. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी स्पेट बाय स्टेप मास्क तयार करण्याची टेकनिक सांगितली आहे.

इंद्रान्स हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेता आहेत. ‘अंडर द ट्री’, ‘सीआडी’, ‘सॉल्ट मँगो ट्री’, ‘काडू पुक्कूना नेरम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. विशेष करुन त्यांना विनोदी अभिनयासाठी ओळखले जाते. अभिनयसृष्टीत येण्यापूर्वी ते कपडे शिवण्याचे काम करत होते. वेशभूषाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आज ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडिच्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 11:51 am

Web Title: malayalam actor indrans shows how to make a face mask at home mppg 94
Next Stories
1 अशोक सराफ यांनी सांगितल्या ‘हम पांच’च्या आठवणी; विद्या बालनबद्दल म्हणाले…
2 रंगोली चंडेलची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाली…
3 एकता कपूरने ‘महाभारत’ मालिकेचा सत्यानाश केला; मुकेश खन्नांची टीका
Just Now!
X