अभिनेता सुशांत राजपूतने आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आता मराठी चित्रपटसृष्टीलाही धक्का देणारी घटना अलिकडेच घडली असून ‘खुलता कळी खुलेना’फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या पत्नीनेदेखील आत्महत्या केली. या घटनेनंतर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. यात अभिनेता हेमंत ढोमे यानेदेखील सोशल मीडियाचा आधार घेत त्याच मत मांडलं आहे.
आत्महत्या केल्यामुळे आपल्याला त्रास देणाऱ्याला व्यक्तीला वेदना होतील या विचाराने काही जण आत्महत्येसारखं पाऊल उचलतात का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. सोबतच आयुष्य सुंगर आहे ते स्वाभिमानाने जगू असा संदेशही त्याने दिला आहे. सध्या त्याच्या या ट्विटची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे.
आत्महत्या केल्याने ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना झाल्या त्यांना वेदना होतील
अशी मानसिकता बनतेय का तरूण पिढीची?
खूप चुक आहे हे… आपलं आयुष्य जसं आहे, ते खूप स्वाभिमानानं जगु शकतो ही भावना बळावली पाहिजे!
आयुष्य जसं आहे ते सुंदर आहे, ते जगलं पाहिजे! जिंकलं पाहिजे#lifeisbeautiful
— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) July 30, 2020
“आत्महत्या केल्याने ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना झाल्या त्यांना वेदना होतील अशी मानसिकता बनतेय का तरूण पिढीची? खूप चुक आहे हे… आपलं आयुष्य जसं आहे, ते खूप स्वाभिमानानं जगु शकतो ही भावना बळावली पाहिजे! आयुष्य जसं आहे ते सुंदर आहे, ते जगलं पाहिजे! जिंकलं पाहिजे #lifeisbeautiful”, असं ट्विट हेमंतने केलं आहे.
दरम्यान, हेमंत ढोमे अनेक वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतो. सध्याच्या काळात लॉकडाउन असल्यामुळे सारेच जण घरात आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून हेमंत चाहत्यांच्या संपर्कात आहे आणि त्याचे विचार तो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे.