28 February 2021

News Flash

…म्हणून बऱ्याचदा इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अपूर्वा नेमळेकर असते शेवंताच्या लूकमध्ये

अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे

अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर हे नाव आता मराठी कलाविश्वाला नवीन राहिलेलं नाही. ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या अपूर्वाचे आज असंख्य चाहते आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांना भावणाऱ्या या भूमिकेच्या प्रेमात खुद अपूर्वाही पडली असून ही भूमिका अंगात भिनल्याचं ती म्हणाली आहे.

“माझ्यासाठी शेवंता ही केवळ भूमिका किंवा व्यक्तीरेखा नसून हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा भाग झाली आहे. चाहतेदेखील या भूमिकेवर मनापासून प्रेम करत आहेत. त्यामुळेच मी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मालिकेतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसंच ज्यावेळी मी इन्स्टाग्राम लाइव्हवर येते तेव्हादेखील मी शेवंताच्याच लूकमध्ये येते. प्रेक्षकांना माझ्या पात्राशी जोडून ठेवण्याचा मी हा प्रयत्न केला आहे. शेवंताचं पात्र हे माझ्या अंगात प्रचंड भिनलं आहे. त्यामुळे लॉकडाउननंतर पुन्हा ही भूमिका करण्यास मी उत्सुक आहे”, असं अपूर्वा म्हणाली.

दरम्यान, करोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे जवळपास दोन- अडीच महिने देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. या काळात सारं काही बंद असल्यामुळे नाटक, मालिका, चित्रपट यांचंही चित्रीकरण बंद होतं. त्यामुळे या कालावधीत प्रेक्षकांप्रमाणेच सेलिब्रिटीदेखील घरी राहून कंटाळले होते. मात्र आता अडीच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार पुन्हा एकदा जोमाने काम करण्यास उत्सुक आहे. यातच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरही उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 3:56 pm

Web Title: marathi actress apurva nemlekar ratris khel chale 2 shevanta ssj 93
Next Stories
1 आईच्या उपचारासाठी अभिनेत्री मागते चाहत्यांकडे मदत
2 लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर स्पृहा जोशीचा ‘खजिना’ ठरला हिट
3 “ती.. मी नव्हेच”; व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
Just Now!
X