News Flash

‘सिटी ऑफ ड्रिम्स’नंतर प्रियाची नवी वेब सीरिज , उमेशसोबत करणार स्क्रीन शेअर

'लोकसत्ता ऑनलाइन'शी बोलताना प्रियाने या सीरिजविषयी सूचक वक्तव्यही केलं होतं

प्रिया बापट, उमेश कामत

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत. ‘टाइम प्लीज’ या चित्रपटामुळे या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये विशेष हिट झाली. या चित्रपटानंतर या दोघांनीही स्वतंत्रपणे अनेक वेगवेगळे चित्रपट केले. या काळात प्रियाने डिजिटल क्षेत्रातही पदार्पण केलं. मात्र या दोघांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर झाले आहेत. काही दिवसापूर्वी प्रियाने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला एक मुलाखत दिली होती. दरम्यान तिने उमेशसोबत आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे उमेशचा आणि तिचा हा आगामी प्रोजेक्ट नक्की कोणता असावा याकडे चाहत्याचं लक्ष वेधलं होतं.

नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही जोडी पहिल्यांदाच एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आणि काय हवं?… ‘असं त्यांच्या आगामी वेब सीरिजचं नाव असून या दोघांही पहिली सीरिज असणार आहे. विशेष म्हणजे उमेशची ही पहिली सीरिज  असून प्रियाची ही दुसरी सिरीज असणार आहे. यापूर्वी प्रिया ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

दरम्यान, प्रिया आणि उमेश त्यांच्या या आगामी प्रोजेक्टसाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही या सीरिजचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रिया नेहमीप्रमाणे खट्याळ अंदाजात दिसत असून उमेश मात्र कूल लूकमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची ही नवी सीरिज  भन्नाट असणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. अद्याप या सिरीजविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 12:52 pm

Web Title: marathi celebrity couple umesh kamat and priya bapat first web series ssj 93
Next Stories
1 परदेशी प्रेक्षकांनाही ‘कबीर सिंग’ची भुरळ; ऑस्ट्रेलियात ‘उरी’लाही टाकलं मागे
2 पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार हृतिक- दीपिका !
3 अमिषा पटेलला अटक होणार ?
Just Now!
X