बंगाली साहित्यकार शरदचंद्र चटर्जी यांच्या ” देवदास” या बहुचर्चित कादंबरीवर आधारीत हिंदी चित्रपटाप्रमाणे आता मराठीतही चित्रपट निर्माण होत असून उद्या दुपारी त्याचा पहिला टीझर प्रकाशित होणार आहे. या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या लाँस्ट अँण्ड फाऊंड या चित्रपटाबरोबर तो प्रेक्षकांना दाखवण्यात येईल. ऋतुराज धालगडे या मराठी देवदासचे दिग्दर्शक असून अलिकडेच एका जुन्या अभिनेत्याच्या आयुष्यावरील चित्रपटातून भूमिका साकारणाराच कलाकार ही व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा आहे. पारो व चंद्रमुखी यांच्या भूमिकेसाठीच्या अभिनेत्रीची लवकरच निवड होणार आहे. हिंदीत यापूर्वीच तिनदा ‘देवदास’ पडद्यावर आला असून के.एल.सैगल , दिलीप कुमार व शाहरूख खान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी या चित्रपटाची भरपूर चर्चादेखिल झाली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
Marathi Devdas: मराठी “देवदास”चा पहिला टीझर उद्या
पारो व चंद्रमुखी यांच्या भूमिकेसाठीच्या अभिनेत्रीची लवकरच निवड होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-07-2016 at 22:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi devdas teaser launch