27 September 2020

News Flash

आयुष्य समृध्द करणाऱ्या एका “सायकल” चा प्रवास

या चित्रपटात भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव आणि हृषिकेश जोशी यांची प्रमुख भूमिका आहे.

सायकल

कलर्स मराठीवरील मालिका आणि कार्यक्रम यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेची कथा, मालिकेतील कलाकार यांना प्रेक्षकांकडून प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. त्यात लवकरच आता ‘सायकल’ हा चित्रपट कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव आणि हृषिकेश जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरत असून तो येत्या रविवारी म्हणजे २५ डिसेंबरला कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. दुपारी १२ आणि संध्या ७ असं दोनदा हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये भालचंद्र कदम, प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी, दीप्ती लेले, मैथिल पटवर्धन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

दरम्यान, ‘सायकल’ ही एक हलकीफुलकी कथा असून या चित्रपटाद्वारे तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल चित्रपटात तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या चित्रपटात स्वत:च्या सायकलवर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे.

एके दिवशी अचानक केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे केशव अत्यंत निराश होतो. परंतु त्याला आशा आहे कि सायकल नक्की परत मिळेल. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना तो कसा अनभिज्ञपणे चोरांना भेटतो ? प्रवासा दरम्यान त्या चोरांचे आयुष्य कसे बदलते ? केशवला त्याची सायकल परत मिळते का ? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:02 pm

Web Title: marathi movie cycle bhalachandra kadam priyadarshan jadhav
Next Stories
1 Photo : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार
2 #MeToo : रिचा चड्ढाचा कोरिओग्राफरसोबतचा ‘तो’ अनुभव थक्क करणारा
3 Video : दीपिका -रणवीरचा ‘तो’ व्हिडिओ पुन्हा व्हायरल
Just Now!
X