विख्यात लेखक, पत्रकार अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नाव. त्यांचं कार्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. ‘झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचं आहे. या चित्रपटाला राज्यशासनाचे संकलन, कलादिग्दर्शन आणि वेशभूषा हे तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत तर उत्कृष्ट चित्रपट आणि नृत्यदिग्दर्शन नामांकने जाहीर झालेले आहेत. येत्या २२ जून रोजी ‘झिपऱ्या’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेली तीन मुलं दिसत आहेत. त्यापैकी एक जण जिन्यावर बसून वाट पाहतोय, दुसरा मस्तीत उभा ठाकलेला आहे तर तिसरा रुबाबात उभा असून त्याच्या हातात बूट पॉलिशची साधनं दिसत आहेत. हे तिघे कोण आहेत, रेल्वे स्थानकावर काय करत आहेत, या प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे. ‘झिपऱ्या’ ही कादंबरी वाचलेल्यांची आणि न वाचलेल्यांचीही या पोस्टरमुळे उत्सुकता वाढली आहे.

ziprya
‘झिपऱ्या’

वाचा : ..म्हणून मेघना गुलजारने थोपटली अमृता खानविलकरची पाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. निर्माते रणजीत दरेकर आणि प्रस्तुतकर्त्या अश्विनी दरेकर यांनी यापूर्वी ‘रेगे’ सारखा हृदयस्पर्शी आणि गुन्हेगारीचं वास्तव दाखवणारा चित्रपट सादर करून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. आता ‘झिपऱ्या’च्या निमित्ताने एक आशयघन चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.