News Flash

LGBT Pride Month Special: समलैंगिक संबंधांवर प्रकाश टाकणारे हे मराठी सिनेमा आणि शो पाहिले का?

LGBTQ+ ‘एलजीबीटीक्यू’ (समलैंगिक)समुदायावर आधारित काही मराठी सिनेमा आणि शोदेखील आले आहेत.

असं म्हणतात की ‘यू डोन्ट फॅाल इन लव्ह विथ जेंडर,यू फॅाल फॅार पर्सन’. ‘एल,जी.बी.टी’ कम्युनीटीने आजवर समाजाचा विरोध सहन करत समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी लढा दिलाय. आणि म्हणुनच त्यांना मान सन्मान मिळावा यासाठी संपूर्ण जून महिना ‘प्राइड मंथ’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये LGBTQ+ ‘एलजीबीटीक्यू’ (समलैंगिक)समुदायावर अनेक चित्रपट तयार करण्यात आले. समुदायातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या तसचं समाजात त्यांच्याविषयी आपुकी निर्माण होवून मानसिकता बदलण्यासाठी आजवर या विषयाची मांडणी करणारे काही मराठी सिनेमे तसचं वेब सीरिज आल्या आहेत. यातील काही सिनेमा चांगलेच गाजले तर काहींना मात्र फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. हे सिनेमा आणि वेब शो कोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत.

बायोस्कोप-मित्रा:  ‘बायोस्कोप’ ही चार स्टोरीज मिळून एक सिनेमा आहे. या चार सिनेमा मधील एक म्हणजे ‘ मित्रा’.मृण्मयी देशपंडे, विणा जामकर स्टारर  ‘मित्रा’  हा पहिलाच मराठी सिनेमा आहे ज्यात समलैंगिक नात्यावर भाष्य करण्यात आलंय. संदिप कुलकर्णीची कविता ‘आस्था नकोसे वाटते मला’ आणि विजय तेंडुलकर लिखीत ‘मित्राची गोष्ट’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे.

 

फुगे: स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांचा ‘फुगे’ हा सिनेमा समलैंगिक संबधावर आधारित नसला तरी या सिनेमाच्या माध्यमातून समलैंगिक संबध या विषयावर प्रकाश टाकण्यात आलाय. ‘प्रेम’ केवळ प्रेमीयुगुलांचं नसून दोन मित्रांमध्ये देखील असू शकतं हे या सिनेमात दाखवण्यात आलंय.

 

दारावथ: राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ‘ दारावत ‘ या शॅार्ट फिल्मने अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॅामीनेशन पटकावले आहे. या सिनेमाची गोष्ट ही ‘जेंडर आयडेंटिटी’ वर असून या सिनेमाने अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये समीक्षकांची पसंती मिळवली आहे. तसंच या सिनेमाचे दिग्दर्शक निशात रॉय यांना ‘आयरस जो’ या गे समूदायाच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारासोबत ३० हजार युके पाउंडस् देत सन्मानित करण्यात आलं.

सिटी ऑफ ड्रिम्स: हॉट स्टारवरील ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजमध्ये समलैंगिक नात्यावर प्रकाश टाकण्यात आलाय. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटने एका लेसबियन स्त्रीची भूमिका साकारली आहे. राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या या शोमध्ये या महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं गेलंय.

पुढाकार- एक पाऊल: ‘पुढाकार एक पाऊल’ ही शॉर्ट फिल्म ऐका गे कपलवर आधारित असून या सिनेमात दोन तरुणांचा त्यांचे कुटुंबिय कसे स्विकार करतात याची सोपी पण अनोखी गोष्ट पाहायला मिळते. आनंद गोखले आणि प्राची कठाळे यांनी स्वत:ची गोष्ट या शॉर्ट फिल्मच्या माध्यामातून सांगितली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 6:59 pm

Web Title: marathi movies and show baced on lgbt community for pride month kpw 89 aab 97
Next Stories
1 एका ट्रकला पाहून जावेद अख्तर यांनी लिहिलं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं…
2 ‘चोली के पिछे क्या है’ गाण्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई भावूक
3 ‘गंगूबाई काठियावाडी’चं शूटिंग पूर्ण, आता संजय लीला भन्साळी त्याच सेटवर सुरू करणार ही वेब सीरीज
Just Now!
X