06 March 2021

News Flash

 अजितच्या जाळ्यात अडकेल का मंजुळा? सरु आजी नेमकी कोणाची करणार मदत?

मालिकेत येणार रंजकदार वळण

कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे देवमाणूस. पहिल्या दिवसापासून रंजक वळण घेत असलेली ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. त्यातच आता मंजुळा आणि डॉ. अजितकुमार यांच्यात सुरु असलेलं उंदिर-मांजराचं भांडण चांगलंच विकोपाला गेलं आहे. मंजुळा सहजासहजी आपल्या जाळ्यात अडकत नसल्यामुळे अजित आता गावकऱ्यांना घेऊन तिच्या घरी जाणार आहे. यामध्येच सरु आजीदेखील या दोघांच्या भांडणात पडणार आहे. मात्र, सरु आजी नक्की कोणाची बाजू घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंजुळावर भूरळ पाडण्यासाठी डॉ. अजितकुमारने अनेक प्रयत्न केले. मात्र, मंजुळाच्या स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणामुळे त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडलं. त्यामुळेच मंजुळाच्या घरात काही तरी दडलेलं आहे असं सांगत तो तिच्यावर सूड उगवण्यासाठी गावकऱ्यांना घेऊन तिच्या घरी जातो. परंतु,अजितकुमार काही गडबड करण्यापूर्वीच मंजुळा घराचं दार उघडते आणि सगळ्यांसमोर तिच्या व्हिलचेअरवर बसलेल्या नवऱ्याची ओळख करुन देते. हीच माहिती सरु आजीला कळते आणि ती टोण्यासह मंजुळाच्या घराकडे रवाना होते. मात्र, या सगळ्या प्रकारात ती नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे मालिका पाहिल्यानंतरच सगळ्याचा उलगडा होईल.

दरम्यान, मंजुळाने ऐनवेळी पलटलेल्या या डावामुळे अजितकुमारची नाचक्की होते आणि तो गावातून नाहीसा होतो. परंतु, डॉक्टर नेमका कुठे गेला हे कोणालाच माहित नसल्यामुळे सगळीकडे शोधाशोध होते. यामध्येच सगळे जण मंजुळावर आरोप करतात आणि तिच्यामुळे डॉक्टर गायब असल्याचं म्हणतात. त्यामुळेच मंजुळेला आता पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागणार आहे. मात्र, या मालिकेत आता नेमकं पुढे काय घडतं हे मालिका पाहिल्यावरच सगळ्याचा उलगडा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 4:32 pm

Web Title: marathi tv show devmanus manjula and ajitkumar war saru aaji ssj 93
Next Stories
1 Then and Now… फोटो शेअर करत हेमा मालिनी यांनी धरम पाजींना दिल्या खास शुभेच्छा
2 ऐश्वर्या- माधुरीचा सेटवर मजामस्ती करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल
3 …म्हणून शर्मिला यांना वाटते तैमूरची चिंता
Just Now!
X