हिंदी चित्रपटांप्रमाणेच दर्जेदार कथा, तगदी स्टार कास्ट या सर्वांच्या आधारावर मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. आता मराठी वेब सीरिजदेखील त्यांचे मूळ रुजवण्यास सज्ज झाल्या आहेत. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी आणि इंग्रजी वेब सीरिजचा दबदबा पाहयाला मिळतो. आता हिंदी आणि इंग्रजी वेब सीरिजच्या शर्यतीमध्ये मराठी वेब सीरिजही उतरताना दिसत आहेत. सध्या अनेक नवनव्या मराठी वेब सीरिजची निर्मिती होत असल्याचे म्हटले जात आहे.

तरुण प्रेक्षकांना सतत चौकटी बाहेरील चित्रपट किंवा वेब सीरिज पाहायला आवडतात. मात्र मराठी मालिकांमध्ये सादर करण्यात येणारा तोच तोचपणा पाहून कंटाळलेले तरुण प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा जास्त वापर करुन वेब सीरिजकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी हिंदी आणि इंग्रजी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे म्हटले जात होते. पण काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मराठी वेब सीरिजलादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम’, ‘यु टर्न’, ‘गोंद्या आला रे आला’, ‘आणि काय हवं’, ‘मुविंग आऊट’, ‘हुतात्मा’ या मराठी वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. या सीरिजने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. आता मराठी वेब सीरिजची उस्तुकता अनेकांमध्ये पाहायला मिळते.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
The movie Swatantryaveer Savarkar Actor Randeep Hooda Marathi language
‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा..’

या वर्षाखेरीज आणखी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘काळे धंदे’, ‘सिटी ऑफ ड्रीम २’ या वेब सीरिजची नावे चर्चेत आहेत. नुकताच ‘वन्स अ इअर’ आणि ‘पांडू’ या दोन वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. ‘वन्स अ इअर’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आणि निपुण धर्माधिकारी ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन मंदार कुरंदकरने केले असून ही वेब सीरिज अवघ्या सहा भागांमध्ये निपुण आणि मृण्मयीची ६ वर्षांची लव्ह स्टोरी सांगून जाते. तर दुसरीकडे प्रदर्शित झालेली ‘पांडू’ ही वेब सीरिज सर्व सामान्य माणसांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि पोलिसांची मानसिकता सांगून जाते. या दोन्ही वेब सीरिज चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळत आहे.