नवीन वर्षात मराठी मनोरंजन विश्वात अनेक नव्या मालिकांना सुरूवात होणार आहे. बऱ्याच नवनवीन गोष्टी घडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडत्या यादीत टीकून राहण्याचं आव्हान प्रत्येक मालिकेपुढे असणार आहे. BARC ची २९ डिसेंबर ते ४ जानेवारी या काळातील टीआरपीची यादी जाहीर झाली आहे. या यादीत राधिकाची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आपलं अव्वल स्थान टिकवून आहे.

गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या यादीत ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या महिन्यातील टीआरपीच्या आकडेवारीनुसार नवीन वर्षांच्या पहिल्या आठवड्यातही ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पहिल्याच स्थानी कायम आहे. या मालिकेनंतर दुसऱ्या स्थानी ‘तूला पाहते रे’ ही मालिका आहे. डिसेंबर २०१८ मध्ये ‘तूला पाहते रे’ चा टीआरपी सतत घसरतच राहिला. ही मालिका कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या क्रमांकावर घसरली होती. मात्र मालिकेतील ट्विस्ट, इशा- विक्रांत सरंजामेंचं लग्न यामुळे मालिका पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

तर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातही तिसऱ्याच स्थानी आहे. २०१८ च्या वर्षाअखेरीस ही मालिका दुसऱ्या स्थानी असणारी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका चौथ्या स्थानावर आली आहे. तर तर पाचव्या स्थानी ‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.