News Flash

नीना गुप्ताच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित सीरिजच्या दुसऱ्या सीजनची तयारी; ‘मसाबा मसाबा २’चं शूटिंग सुरू

सीरिजच्या पहिल्या सीजनला मिळालेल्या यशानंतर आता सीजन २ साठी तयारी सुरू झालीय. नीना गुप्ता यांची मुलगी फॅशन डिझायर मसाबा हिच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे.

masaba-masaba-neena-gupta-1200
(Photo: Netflix)

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी मसाबा गुप्ता या दोघींमधील स्ट्रॉंग बॉण्डिंग वेळोवेळी दिसून आली आहे. या दोघींनीही आतापर्यंत अनेकदा त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल ऑन आणि ऑफ कॅमरा बोलताना दिसून आल्या. अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी फॅशन डिझायनर असलेली मसाबा या दोघींनी यापूर्वी एकत्र स्क्रीन शेअर करत ‘मसाबा मसाबा’ ही वेब सीरिज भेटीला आणली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा हिच्या आयुष्यावर आधारित कहाणी सांगण्यात आली होती. या वेब सीरिज प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ‘मसाबा मसाबा २’ भेटीला येणार आहे. ‘ मसाबा मसाबा २’च्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झालीय. याची माहिती नीना गुप्ता यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीय.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलीय. नीना गुप्ता यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ‘मसाबा मसाबा २’ या दुसऱ्या सीजनमधील सर्व टीम मेंबर्स मसाबा नावाने हाक मारत तिला शोधत असल्याचं दाखवण्यात आलंय. व्हिडीओच्या अखेरीस या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीजनच्या शूटिंग सुरूवात झाली असल्याचं सांगण्यात आलंय. हा व्हिडीओ शेअर करताना नीना गुप्ता यांनी एक पोस्ट देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “तर मग तू तिथे आहेस का? आम्ही तुला इथे सर्वत्र शोधतोय…” या पोस्टमध्ये नीना गुप्ता यांनी मुलगी मसाबाला सुद्धा मेन्शन केलंय. त्याचप्रमाणे ‘मसाबा मसाबा २’ च्या शूटिंगला सुरूवात झाली असल्याचं देखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलंय.

‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजचा पहिला सीजन ऑगस्ट २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता. या पहिल्या सीजनमधून नीना गुप्ता यांची मुलगी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने डेब्यू केलं होतं. या सीरिजमध्ये नीना गुप्ता आणि मुलगी मसाबा गुप्ता या दोघी माय-लेकी एकत्र दिसून आल्या होत्या. या पहिल्या सीजनला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्या सीजनच्या यशानंतर या सीरिजचा दुसरा सीजनचा निर्णय सीरिजच्या मेकर्सनी घेतला.

पहिला सीझन जिथे संपला तिथून पुढची कथा सुरू होईल. ही वेब सीरिज यावर्षीच्या अखेरीस प्रदर्शित करण्यात येईल, असं बोललं जातंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 11:29 pm

Web Title: masaba masaba season 2 begins shoot neena gupta prp 93
Next Stories
1 ‘फिल्मफेअर’च्या कव्हर पेजवर झळकली शहनाज गिल; फॅन्स झाले आश्चर्यचकित
2 जेव्हा माधुरी दीक्षित बनली जया बच्चन, तेव्हा रेखा म्हणाली, ‘अमित माझं प्रेम आहे…त्यांना कसं सोडू शकते मी?’
3 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील जीजी अक्का आहे ‘या’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून
Just Now!
X