‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर तीन महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिने हिंदीत पदार्पण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या लोकप्रिय मालिकेची ‘फोर लायन्स’ ही निर्मिती संस्था ‘इमली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणतेय. ही मालिका हिंदी भाषेत असली तरी यात गश्मीर आणि मयुरी असे दोन मराठी चेहरे झळकणार आहेत. मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी नवीन सुरुवात करतेय. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या’, असं तिने या प्रोमो शेअर करत म्हटलंय.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayuri 🙂 (@mayurideshmukhofficialll) on

मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने ऑगस्टमध्ये नांदेड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं होतं, असं म्हटलं जातं. पतीच्या आत्महत्येचं दु:ख सावरत मयुरी आता पुन्हा एकदा नव्या सुरुवातीसाठी सज्ज झाली आहे.