News Flash

माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, नाना पाटेकरांचं ‘सिंटा’कडे स्पष्टीकरण

‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’ने पाठवलेल्या नोटीशीला नाना पाटेकरांनी दिलं उत्तर

‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांनंतर ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ म्हणजेच ‘सिंटा’ने पाठवलेल्या नोटीशीला उत्तर देताना नाना पाटेकरांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.


माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. तनुश्री दत्तावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उत्तर नाना पाटेकरांनी सिंटाकडे दिलं आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांची दखल घेत सिंटाने नाना पाटेकर यांना नोटीस पाठवून विचारणा केली होती, त्यानुसार आज नाना पाटेकरांनी आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिसांकडे नाना पाटेकर यांची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत या चाचण्या करण्यासाठी ओशिवरा पोलिसांकडे अर्ज केला आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांची सुद्धा नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने १० ऑक्टोबरला ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये या चौघांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2018 6:27 pm

Web Title: metoo nana patekar has sent a detailed response to cintaa over the notice they sent him based on complaint by tanushree dutta
Next Stories
1 #MeToo : ‘सिंटा’च्या लैंगिक शोषणविरोधी समितीत रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर
2 Video : गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर प्रदर्शित
3 प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात !
Just Now!
X