10 July 2020

News Flash

मिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या

या प्रकरणी सध्या पोलीस चौकशी सुरु आहे

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंगच्या मॅनेजरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मॅनेजरचे नाव सौम्या सोयब खान असे आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मिकाच्या स्टुडियोमध्ये काम करत होती. या प्रकरणी सध्या पोलीस चौकशी करत आहेत.

वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ फेब्रुवारी रोजी घडली आहे. सौम्या या २८ वर्षीय महिलेने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याने स्टुडिओमध्ये तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. आत्महत्येपूर्वी सौम्याने कोणतीही सुसाइट नोट लिहिलेली नाही.

मिका सिंगने सौम्याच्या मृत्यूनंतर इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केले आहे. ‘लहान वयात सौम्या आम्हाला सोडून गेली आणि तिच्या अनेक आठवणी मागे सोडून गेली. तिने अदीच लहान वयात जगाचा निरोप घेतला. तिच्या आत्माला शांती मिळो’ असे कॅप्शन मिकाने देत दु:ख व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 11:21 am

Web Title: mika singh manager commits suicide in studio avb 95
Next Stories
1 शत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल
2 उपहासातून वास्तवाकडे..
3 ‘लगान’मधील अभिनेत्याचा वयाच्या ७०व्या वर्षी होणार घटस्फोट?
Just Now!
X