02 March 2021

News Flash

कमी वयाचा पार्टनर असल्यामुळे नात्यात फरक पडतो का? मिलिंद म्हणतो…

वयाच्या ५२ व्या वर्षी मिलिंदने २६ वर्षीय अंकितासोबत लग्नगाठ बांधली

कलाविश्वातील कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार. वयाच्या ५२ व्या वर्षी मिलिंदने २६ वर्षीय अंकितासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात जवळपास २६ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा या दोघांच्या वयातील अंतराची चर्चा होत असते. मात्र, मिलिंद आणि अंकिता कायम या चर्चांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र, अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत मिलिंदने वयातील अंतरावर मौन सोडलं आहे.

मिलिंद आणि अंकिता यांच्या वयात असलेल्या अंतरामुळे बऱ्याच वेळा या जोडीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. त्यातच अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत मिलिंदला त्याच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. ‘कमी वयाचा लाईफ पार्टनर असल्यामुळे नात्यातील प्रमाणिकतेवर परिणाम होतो का?’, असा प्रश्न मिलिंदला विचारण्यात आला. त्यावर मिलिंदने सडेतोड उत्तर दिलं आहे.

“प्रामाणिकपणाचा संबंध शेट तुमच्या समंजसपणा आणि विचार यांच्यावर अवलंबून आहे. प्रामाणिकपणा आणि शारीरिक जवळीकता यांचा काहीही संबंध नाही. तुमच्यासाठी नेमकं काय महत्वाचं आहे यावर सगळं अवलंबून असतं. नात्यात सेक्स तितका महत्वपूर्ण नसून तुमच्यातील भावनिक नातं महत्वाचं आहे. ते कसं आहे, यावर सगळ अवलंबून असतं”, असं मिलिंद म्हणाला.

दरम्यान, मिलिंद आणि अंकिता कलाविश्वातील कायम चर्चेत राहणारी जोडी आहे. अनेकदा ते त्यांच्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. २०१८ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली असून २०१४ पासून ते एकमेकांना डेट करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 5:37 pm

Web Title: milind soman epic reply when asked if chances of cheating on a much younger wife are less ssj 93
Next Stories
1 ‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत म्हणाला…
2 आर्याचा मृत्यू अटळ? विराटने आखली ‘ही’ योजना
3 इन्स्टाग्रामवर ‘कालीन भैय्या’चा दबदबा; फॉलोअर्सच्या संख्येत वाढ
Just Now!
X