जगभरात सध्या करोना व्हायरसने आपली दहशत पसरवली आहे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. अमिताभ यांचा हा व्हिडीओ भारतीय रेल्वे प्रशासनाने जनजागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अमिताभ यांनी कुठल्या टिप्स दिल्या आहेत?
बॉलीवुड अभिनेता श्री अमिताभ बच्चन जी ने कोरोना वायरस को रोकने के तरीके के बारे में जानकारी साझा की।
जागरूक बने और दूसरों को भी जागरूक करें।# COVID2019 pic.twitter.com/R0bQ56uLZJ
— Ministry of Railways (@RailMinIndia) March 17, 2020
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.
- एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका. वापरलेला टिश्यू पेपर बंद झाकणाच्या पेटीत टाका
- डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
- आपले हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा
- गरज नसताना घराबाहेर पडू नका
- जर खोकला, सर्दी किंवा ताप असल्याचे जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे उपचारासाठी जा. इतरांपासून अंतर ठेवून राहा. जेणेकरुन तुमच्या आजारांची लागण इतरांना होणार नाही.
- अधिक माहितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ०११ २३९७८०४६ किंवा १०७५ या क्रमांकावर संपर्क साधा
देशभरातील लोक सध्या करोना विषाणूच्या दहशतीमुळे त्रस्त आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या खास टिप्ससाठी बिग बींचे आभारदेखील मानले आहेत.