News Flash

शाहिद कपूर सोशल मीडियावर मागतोय काम; पत्नी मीराला ठरवलं जबाबदार

वाचा शाहिदची पोस्ट

‘कबीर सिंग’ या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरच्या दमदार अभिनयाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. या चित्रपटानंतर त्याला इतरही बरेच ऑफर्स येऊ लागले आणि त्याने त्याचं मानधनही वाढवल्याची चर्चा आहे. करिअरमध्ये सगळं काही चांगलं सुरू असतानाही शाहिदने अचानक सोशल मीडियावर पोस्ट लिहित कामाची मागणी केली. इतकंच नव्हे तर यासाठी त्याने पत्नी मीरा राजपूतला जबाबदार ठरवलं.

शाहिदचे चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असले तरी त्याची पत्नी मीरा त्याच्या या चित्रपटांवर नाखूश असल्याचं दिसतंय. म्हणूनच शाहिदने पोस्ट लिहित वेगळ्या धाटणीच्या भूमिकांची मागणी केली आहे. “ज्या चित्रपटात मला धमाल मस्ती आणि डान्स करायला मिळेल असा चित्रपट मी का करत नाही, असा सवाल माझ्या पत्नीने मला विचारला आहे. तर अशा प्रकारचा चित्रपट असेल तर कृपया मला संधी द्या, जेणेकरून मी माझ्या पत्नीला खूश करू शकेन”, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय.

‘कबीर सिंग’नंतर शाहिद आणखी एका तेलुगू रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जर्सी’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाच्या तयारीला त्याने सुरुवात केली. यामध्ये शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारणार असून तो सध्या क्रिकेटविषयीचे बारकावे शिकत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 10:50 am

Web Title: mira rajput wants shahid kapoor to do fun film in which he can dance shahid asks for work ssv 92
Next Stories
1 बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत; केबीसीतील चर्चेनंतर झाला खुलासा
2 ‘तापसीच माझी खरी चाहती’; कंगनाचा टोला
3 नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर मौनीचे बोल्ड फोटो; नंतर मागितली माफी
Just Now!
X