27 November 2020

News Flash

Mirzapur 2 : दुसऱ्या सिझनसाठी पाच पटीने जास्त पैसे झाले खर्च; जाणून घ्या किती आहे बजेट?

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर आधारित असलेली ही वेब सीरिज पहिल्या सिझनपासूनच चर्चेत आहे.

प्रचंड चर्चेत असलेल्या मिर्झापूर वेब सीरिजचा दुसरा सीजनही प्रदर्शित झाला. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिर्झापूर-२ बघण्यासाठी प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. सध्या सोशल माध्यमांसह सगळीकडं या वेब सीरिजची चर्चा होतेय. (छायाचित्र सौ.- instagram.com/yehhaimirzapur/)

अॅमेझॉन प्राइमवर बहुप्रतिक्षित व बहुचर्चित ‘मिर्झापूर २’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे आणि सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहे. पहिला सिझन संपल्यापासूनच दुसऱ्या सिझनची उत्सुकता प्रचंड वाढली होती. आता या वेब सीरिजचा तिसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सिझनपेक्षा अधिक खर्च दुसऱ्या सिझनसाठी झाला आहे.

विशेष म्हणजे दुसऱ्या सिझनसाठी कलाकारांचं मानधनसुद्धा वाढवण्यात आलं आहे. ‘मिर्झापूर’मुळे कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना या भूमिका प्रसिद्ध झाल्या. पहिल्या सिझनचा बजेट १२ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसऱ्या सिझनसाठी निर्मात्यांनी तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. आता तिसऱ्या सिझनसाठी या बजेटमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : रंगला हळदी व मेहंदीचा कार्यक्रम; पाहा नेहा कक्कर-रोहन प्रीत सिंगचे रोमॅण्टिक फोटो

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर आधारित असलेली ही वेब मालिका पहिल्या सिझनपासूनच वादात अडकली होती. यातील रक्तपात, शिवीगाळ यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, पंकज त्रिपाठींनी साकारलेला कालीन भैय्या, उत्कंठावर्धक आणि मसालेदार कथा आणि संवादांमुळे ती लोकप्रियही ठरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 5:20 pm

Web Title: mirzapur 2 know about web series budget and cast fee budget ssv 92
Next Stories
1 दिशानं शेअर केलेल्या चित्रावरून वाद; अर्जेटिनाचा चित्रकार झाला नाराज
2 अरे हे काय झालं? बादशाहने फोटो शेअर करताच चाहत्यांना पडला प्रश्न
3 ‘पृथ्वीराज’ व ‘KGF 2’ मध्ये संजयचे अॅक्शन सीन नाही? जाणून घ्या कारण
Just Now!
X