29 September 2020

News Flash

मोहन जोशी छोट्या पडद्यावर; राजश्री प्रॉडक्शनसोबत पहिल्यांदाच करणार काम

मोहन जोशी लवकरच एका हिंदी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी लवकरच एका हिंदी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. राजश्री प्रॉडक्शन निर्मित ही मालिका असून ‘डॅडी अम्मा मान जाओ’ असं तिचं नाव आहे. स्टार प्लस या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

मोहन जोशी यांनी अनेक नाटके, चित्रपट, टीव्ही मालिकांमधून काम केले आहे. आता ते जवळपास दशकानंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. मोहन जोशी आणि सीमा बिस्वास या दोन दिग्गज कलाकारांना पडद्यावर एकत्र काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल.

आणखी वाचा : सई मांजरेकरचा अस्सल मराठमोळा लूक; सेलिब्रिटींनाही घातली भुरळ

सूरज आर. बडजात्या आणि त्यांचा मुलगा देवांश एस. बडजात्या यांनी त्यांची ही नवीन मालिका स्वर्गीय राजकुमार बडजात्या यांना समर्पित केली केली आहे. देवांश राजश्री प्रॉडक्टशनच्या टेलिव्हिजन विभागाचा प्रमुख असून या मालिकेचा निर्मातादेखील आहे. या संधीबद्दल मोहन जोशी म्हणतात, “मी राजश्री प्रॉडक्शन सोबत काम करण्यास फारच उत्सुक आहे. कारण त्यांना प्रेक्षकांची नस बरोबर माहीत आहे. आम्ही या मालिकेच्या माध्यमातून जी कथा दाखवणार आहोत ती प्रत्येकाशी जुळणारी असली तरी वेगळी आहे.”

या मालिकेत मोहन जोशी, सीमा बिस्वास यांच्यासोबतच शीन दास आणि अनघा भोसले यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 6:42 pm

Web Title: mohan joshi and rajashri productions team up for the first time for dadi amma dadi amma maan jaao ssv 02
Next Stories
1 सई मांजरेकरचा अस्सल मराठमोळा लूक; सेलिब्रिटींनाही घातली भुरळ
2 आदित्य आणि नेहाच्या लग्नामुळे उदीत नारायण यांना होणार हा फायदा?
3 ‘बिग बॉस मराठी’ फेम रुपालीने पुण्याच्या मॉलमध्ये ‘त्या’ खास व्यक्तीला केलं प्रपोज
Just Now!
X