06 March 2021

News Flash

दीप-वीरच्या लग्नापेक्षाही ‘या’ जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा

‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांच्या शाही लग्नाचा प्रथम क्रमांक लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

यंदाचं वर्ष सेलिब्रिटींसाठी खास ठरलं. २०१८ मध्ये अनेक सेलिब्रिटी जोड्यांनी लग्नगाठ बांधली. त्यात अभिनेत्री दीपिका -रणवीर, प्रियांका -निक, इशा अंबानी-आनंद पिरामल आणि कपिल शर्मा- गिन्नी चतरथ या जोड्यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे गुगलनेही २०१८तील सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या लग्नाची एक यादी जाहीर केली. या यादीमध्ये बॉलिवूडमधील ‘देसी गर्ल’च्या लग्नाविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्वात जास्त वेळा सर्च केल्याचं समोर आलं आहे.

गुगलने जाहीर केलेल्या ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या या यादीत प्रियांका चोप्राच्या लग्नाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रियांकानंतर दीपिकाच्या लग्नाचाही समावेश यात करण्यात आला असून या दोन्ही अभिनेत्रींच्या लग्नाचा समावेश गुगलच्या ‘टॉप-५’ लिस्टमध्ये करण्यात आला आहे. याचा अर्थ भारतीय सेलिब्रिटींचे हे लग्न विदेशातही ट्रेंडमध्ये राहिले.

२०१८ मधील ‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांच्या शाही लग्नाचा प्रथम क्रमांक लागतो. १९ मे २०१८ साली लग्नाच्या बेडीत अडकलेल्या या जोडीच्या लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न आहे. १ व २ डिसेंबरला प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवनात दोघांनीही ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. प्रियांकाचा बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही वावर आहे. त्यामुळे या लग्नावर अख्ख्या जगाच्या नजरा खिळल्या होत्या.

दरम्यान,‘मोस्ट गुगल्ड वेडिंग’च्या यादीत तिस-या क्रमांकावर प्रिन्सेस Eugenieचे लग्न असून चौथ्या स्थानावर Kat Von Dचे लग्न आहे. तर पाचव्या स्थानावर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न आहे. दीप-वीरने गेल्या १४ व १५ नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे लग्न केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 12:42 pm

Web Title: most googled weddings 2018 top 5 list most googled wedding
Next Stories
1 Me Too: अटकपूर्व जामीनसाठी आलोक नाथांची दिंडोशी न्यायालयात धाव
2 Photo : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी
3 महा सिनेमाच्या पोस्टरमध्ये हंसिका चिलीम ओढताना, कोर्टात याचिका दाखल
Just Now!
X