01 March 2021

News Flash

‘जुबां केसरी’ म्हणणाऱ्या अजय देवगणला ‘शक्तिमान’चा रोखठोक सवाल…

पाहा, मुकेश खन्ना नेमकं काय म्हणाले

वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकदा चर्चेत येणारा अभिनेता मुकेश खन्ना पुन्हा एकदा अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खान यांना टोला लगावला आहे.

मुकेश खन्ना यांनी ‘उंचे लोगों की नीची पसंद है’, असं शीर्षक असलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओसोबत त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला आहे. ज्यात अजय देवगण आणि शाहरुख खान यांनी केलेल्या जाहिरातींचे फोटो आहेत.


“बोलो जुबां केसरी, “ऊंचे लोगों की पसंद, मी उगाच नाही I AM MAN OF ALL SEASONS होत. नेमकं काय आहे हे सगळं? लोकांची दिशाभूल करण्याचा सगळ्यात भयानक मार्ग. हानिकारक वस्तूंचा चुकीच्या पद्धतीने केलेला प्रसार. हा प्रकार कोणीच थांबवू शकत नाही.सेवन करणारे, प्रचार करणारे किंवा सरकार कोणीच हा प्रकार थांबवू शकत नाही”, असं ट्विट मुकेश खन्ना यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

दरम्यान, मुकेश खन्ना यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी सरकारकडे ‘अशा हानिकारक उत्पादनांना परवानगी देऊ नका’, अशी विनंती केली आहे. सोबतच अशा जाहिराती करणाऱ्या काही कलाकारांनी त्यांनी टोलाही लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2020 5:03 pm

Web Title: mukesh khannas attack on shahrukh khan and ajay devgan dcp 98
Next Stories
1 ‘मेरे घर आयी एक नन्ही परी…; मनोज तिवारी यांना कन्यारत्न
2 ‘अतरंगी रे’चे दिग्दर्शक आनंद एल. राय यांना करोनाची लागण
3 रिया चक्रवर्ती नव्या घराच्या शोधात? सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X