मुंबई- पुणे वाद हा मुंबईकर आणि पुणेकरांनाही काही नवा नाही. पण एकमेकांशी वाद घालणारे हे मुंबई -पुणेकर एकमेकांच्या प्रेमात पडले तर..? गौरी-गौतमची अशीच काहीशी हटके लव्हस्टोरी सांगणारा ‘मुंबई-पुणे -मुंबई’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मुंबई-पुणे -मुंबई’चा तिसरा भाग म्हणजेच ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ येत्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. गौरी- गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असून त्याचीच तयारी या गाण्यात पाहायला मिळत आहे.

‘कुणी येणार गं’ हे गाणं स्वप्नील जोशीने ट्विटरवर शेअर केलं आहे. ‘आमच्या आनंदात सामील व्हा,’ असं स्वप्नील म्हणतोय. सुखी संसाराची तीन वर्षे पूर्ण केलेल्या गौरी आणि गौतम या दोघांच्या आयुष्यात लवकरच गोंडस पाहुणा येणार आहे. त्याच्याच स्वागताची तयारी दोन्ही कुटुंबीय करत आहेत. गौरीच्या डोहाळे जेवणाचीही झलक या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

वाचा : छोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई- पुणे- मुंबई’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आलेल्या चित्रपटाच्या सिक्वललाही महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिका, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधील चित्रपट रसिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे एकंदरच गौतम आणि गौरीवरचा प्रेक्षकांचं प्रेम पाहता या प्रेमकथेचा आणखी एक पदर ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ मध्ये उलगडणार आहे. हा चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.